क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित नम: नाशिक “प्रॉपर्टीचा महाकुंभ” प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद
क्रेडाई नाशिक मेट्रोच्या प्रॉपर्टी एक्स्पो मुळे नाशिकमध्ये रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीची योग्य संधी
नाशिक, दि. १६ ऑगस्ट २०२५ – CREDAI Nashik Property Expo क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे ठक्कर डोम येथे सुरू असलेल्या “नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ” या गृहनिर्माण प्रदर्शनाला नाशिककरांसह राज्यभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाला दोन दिवस शिल्लक असून, पहिल्या तीन दिवसांतच ४० हून अधिक फ्लॅट्स आणि २५ हून अधिक प्लॉट्सची स्पॉट बुकिंग झाली आहेत.
क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉंग वीकेंडचा लाभ घेत अनेक संभाव्य ग्राहकांनी प्रकल्पांना भेट दिली तसेच साइट व्हिजिटचे नियोजन देखील झाले. त्यांनी सांगितले की, २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये स्वतःचे घर असावे, अशी भावना नागरिकांत दिसून येत आहे.
ठक्कर म्हणाले, “नाशिकची वाटचाल ग्लोबल सिटीच्या दिशेने होत आहे. उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि संस्कृती या चतु:सूत्रीवर शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्या सहभागाने भविष्यातील नाशिक घडत आहे. या प्रदर्शनातून त्याचं दर्शन घडत आहे.”
रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीची योग्य वेळ (CREDAI Nashik Property Expo)
प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते यांनी सांगितले की, नाशिक हे औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक व कृषिपूरक संधींनी समृद्ध शहर आहे. त्यामुळे येथे रोजगार व व्यवसायाच्या प्रचंड शक्यता आहेत. “घरांच्या किमती आगामी काळात वाढू शकतात. त्यामुळे सध्याचा काळ रियल इस्टेट गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे,” असे ते म्हणाले.
नरेंद्र कुलकर्णी यांनीही शहराच्या अर्थकारणात बांधकाम क्षेत्राचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. “एका गृह प्रकल्पामुळे हजारो लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे बांधकाम उद्योग शहराच्या प्रगतीचा मुख्य आधार आहे,” असे ते म्हणाले.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
५०० हून अधिक फ्लॅट्स, प्लॉट्स, दुकाने व ऑफिसेसचे पर्याय
आघाडीच्या गृहकर्ज देणाऱ्या संस्थांचा सहभाग
पूर्ण वातानुकूलित डोम व प्रशस्त पार्किंग
आकर्षक ऑफर्सची रेलचेल
वेळ: सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत प्रवेश
चर्चासत्रातून जनजागृती
या एक्स्पोदरम्यान नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ ऑगस्ट : स्मार्ट सिटी – स्मार्ट कुंभ (वक्ता : गुरमीत सिंग अरोरा, डॉ. अंशुल गुजराती)
१६ ऑगस्ट : शाश्वत शहर, शाश्वत कुंभ (वक्ता : शेखर सिंग, राकेश भाटिया)
१८ ऑगस्ट : पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी संवेदनशील नियोजन
पहिले सत्र : स्वच्छ हवा, पाणी व जमिनीच्या संवर्धनासाठी पर्याय (वक्ता – अजित गोखले)
दुसरे सत्र : नेट झिरो इमारतींची संकल्पना (वक्ता – ममता रावत)
प्रदर्शनास पाठिंबा
दिपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. तर तुषार संकलेचा, मनोज खिवंसरा, कृणाल पाटील, अनिल आहेर, उदय घुगे, अंजन भालोदिया, श्रेणिक सुराणा, सचिन बागड, हंसराज देशमुख आणि श्यामकुमार साबळे ,भूषण कोठावदे या क्रेडाई नाशिक मेट्रो टीमच्या कार्यामुळे प्रदर्शन यशस्वी होत आहे.
या प्रदर्शनातून नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला नवी दिशा मिळत असून, घर घेण्याचा योग्य काळ आत्ताच आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.