क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२३,तीन दिवसात १२००० नागरिकांची  भेट

१५ लाखांपासून ते ५ कोटींपर्यंतची घरे उपलब्ध : १४२ सदनिकांचे बुकिंग

0

नाशिक,दि.२९ऑक्टोबर २०२३- मोठी घरे  तसेच बजेट होम्स कडे  ग्राहकांचा कल असल्याचे  क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२३ च्या पहिल्या तीन दिवसात दिसून येत आहे.  या तीन दिवसात एकूण १२००० नागरिकांनी प्रदर्शनास भेट दिली असून सुमारे १४२ सदनिकांचे बुकिंग झाले असल्याची माहिती  क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष  कृणाल पाटील यांनी दिली .

नाशिक सहित जळगाव , धुळे ,ठाणे , नवी मुंबई येथून तर नागरिक आले असून या वेळी प्रथमच विदर्भातील शहरातून देखील असंख्य नागरिक प्रदर्शनास भेट देऊन येथील प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करत असून नाशिक हे  वेगाने विकसित होणारे शहर असल्या कारणाने  नाशिक मधील रियल इस्टेट मध्ये केलेली आजची गुंतवणूक ही निश्चित भविष्यात निश्चित  फायदेशीर ठरणार असल्याचेही ते म्हणाले ..

नाशिक च्या ठक्कर डोम येथे २६ ऑक्टोबर रोजी सुरू असलेले हे प्रदर्शन सोमवार, ३० ऑक्टोबर पर्यंत चालेल .

परिवाराचा जसा विस्तार होतो तसे त्या परिवाराची घरांची  गरज देखील वाढते . नाशिक मध्ये   अनेक प्रसिद्ध  शैक्षणिक संस्था, विविध कंपन्या , अनेक नामांकित हॉस्पिटल आहेत .  विमान , रस्ते व रेल मार्ग यामुळे वाढलेली कनेक्टिव्हिटी, समृद्धी , चेन्नई -सुरत एक्स्प्रेस वे, नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे , दिंडोरी येथील औद्योगिक प्रगती , आगामी सिंहस्थ या मुळे नाशिक मध्ये भविष्यात अनेक संधी येऊ घातल्या आहेत .त्यामुळे नाशिक मध्ये घर घेण्याचा ओघ वाढला असल्याचे मत प्रदर्शनाचे समन्वयक अंजन भलोदिया यांनी व्यक्त केले .

एसी डोममुळे भरदुपारी गर्दी
अगदी भर दुपारी देखील प्रदर्शनास भेट देणाऱ्यांची गर्दी होत असून, संपूर्ण डोम ए. सी. असल्याने नागरिकांना प्रदर्शन पाहणे सुखकर झाल्याचे सहसमन्वयक ऋषिकेश कोते  यांनी सांगितले.  ८० विकासकांचे ३०० हून अधिक पर्याय तेही अगदी १५ लाखांपासून ते ५ कोटींपर्यंत या प्रदर्शनात उपलब्ध असून  या पर्यायातून ग्राहकांना निवड करता येणार आहे.  प्रदर्शनात बुकिंग कारणाऱ्यास अनेक ग्राहकाभिमुख योजनांचा लाभ देखील घेता येईल  . प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ९ असून या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन पण त्यांनी केले .

CREDAI PROPERTY EXPO 2023, 12000 visitors in three days

क्षणचित्रे
1.आज सुट्टी चे औचित्य साधून साईट विझिट करण्यावर भर
2.सहकुटुंब सहपरिवार भेट देऊन लगेच निर्णय .
3.रोज संध्याकाळी आयोजित संगीत व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद
4. सुसज्ज फूड कोर्ट मध्ये चवीचा आनंद
5. प्रदर्शन मांडणी , सजावट तसेच प्रवेश दाराचे विशेष आकर्षण
6.आघाडीच्या गृह वित्त सहाय करणाऱ्या संस्थाचा सहभागाने ग्राहकास सुविधा .
7.अभियांत्रिकी व वास्तू विशारद विद्यार्थ्यांची प्रदर्शनास भेट

हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष दिपक बागड, सुजॉय गुप्ता, जयंत भातंब्रेकर, नरेश कारडा, खजिनदार हितेश पोद्दार, सहसचिव सचिन बागड, नरेंद कुलकर्णी, अनिल आहेर, सह समन्वयक नितीन पाटील, मनेजिंग कमिटी मेंबर मनोज खिंवसरा, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा हे प्रयत्नशील आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.