क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो गृहप्रदर्शनाचा आज शुभारंभ
बजेट होम्स ते प्रीमियम अपार्टमेंट चे ३०० हून अधिक पर्याय एकच छताखाली
नाशिक,दि. २६ ऑक्टोबर २०२३- आपल्या घरकुलाची स्वप्नपूर्ती व चांगला परतावा देणाऱ्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीच्या संधी येत्या २६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान क्रेडाई नाशिक मेट्रोच्या प्रॉपर्टी एक्स्पो या गृहप्रदर्शनाच्या निमित्ताने ठक्कर डोम येथे एकच छताखाली मिळणार असून या प्रदर्शनाचा शुभारंभ २६ रोजी सकाळी १० वाजता होत असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली.
क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे गृह प्रदर्शन असून मनासारखे बजेट , आवश्यक सर्व सोयी सुविधा आणि मनासारखे लोकेशन या त्रिसूत्री च्या शोधात असणाऱ्यां साठी हे प्रदर्शन म्हणजे एक नामी संधी आहे.
क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रॉपर्टी एक्सपोची असंख्यजण आतुरतेने वाट बघत असतात असे नमूद करून कृणाल पाटील म्हणाले की आपले घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशातच नाशिक प्रगतीच्या व उत्तम कनेक्टिव्हिटी च्या दिशेने अग्रेसर आहे. नाशिक च्या विकासाला चालना देणारे अनेक प्रकल्प पूर्ण झाले असून अनेक प्रकल्प नजीकच्या काळात पूर्ण होतील .या मध्ये समृद्धी महामार्ग, चेन्नई – सुरत महामार्ग, ड्राय पोर्ट, दिंडोरी येथील 300 एकर विस्तारलेला रिलायन्स प्रकल्प, लॉजिस्टिक्स पार्क,आय टी हब आदी काही प्रमुख आहे. त्यामुळे घर व जागेतील आजची गुंतवणूक ही भविष्यात उत्तम परतावा देणार हे नक्की असेही ते म्हणाले .प्रॉपर्टी एक्सपो २०२३ चे समन्वयक म्हणून अंजन भलोदिया तर सहसमन्वयक म्हणून ऋषिकेश कोते व नितीन पाटील हे जबाबदारी सांभाळत आहेत.
प्रॉपर्टी एक्सपो बाबत अधिक माहिती देताना समन्वयक अंजन भलोदिया म्हणाले की, या ४ दिवसीय एक्सपोमध्ये ८० हून अधिक विकसकांचा सहभाग असून ३०० हून अधिक पर्याय उपलब्ध राहणार आहेत. फ्लॅट, प्लॉट, रो हाऊस, दुकाने, ऑफिसेस, फार्म हाऊस अशा विविध पर्यायातून ग्राहकाला निवड करणे सोपे जाईल.या एक्सपो मध्ये एकाच छताखाली असंख्य पर्याय उपलब्ध असल्याने नाशिक सहित धुळे, जळगाव, अहमदनगर, ठाणे, नवी मुंबई येथून देखील असंख्य नागरिक प्रदर्शनास भेट देण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सहसमन्वयक ऋषिकेश कोते म्हणाले की, एकच भेट प्रॉपर्टी चा निर्णय थेट या थीम वर आधारित हे प्रदर्शन सध्याची ऑक्टोबर हिट लक्षात घेऊन पूर्ण वातानुकूलित करण्यात आले असून विशिष्ट रचनेमुळे प्रदर्शन बघण्याची वेगळीच अनुभूती मिळणार आहे.
सहसमन्वयक नितीन पाटील यांनी सांगितले की, प्रदर्शनाचा कालावधी हा दसरा ते दिवाळी दरम्यानचा असून या सणासुदीच्या निमित्ताने असंख्य जण आपल्या नूतन वास्तू घेण्याच्या स्वप्नाचे नियोजन करीत असतात. आघाडीच्या गृह कर्ज पुरवणाऱ्या संस्थांचा सहभाग देखील प्रदर्शनात राहील असेही त्यांनी नमूद केले.
प्रॉपर्टी एक्सपो २०२३ – काही वैशिष्ठ्ये –
1. क्यू आर कोड स्कॅन केल्यास मोफत प्रवेश ( फक्त पूर्व नोंदणीसाठी लागू )
2. पूर्ण पणे वातानुकुलित
3. ३०० हून अधिक पर्याय
4. बजेट होम्स ते प्रीमियम अपार्टमेंट उपलब्ध
सदर प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष दिपक बागड, सुजॉय गुप्ता, जयंत भातंब्रेकर, नरेश कारडा, सचिव गौरव ठक्कर, खजिनदार हितेश पोद्दार, सहसचिव सचिन बागड, अनिल आहेर, नरेंद्र कुलकर्णी, मनेजिंग कमिटी मेंबर मनोज खिंवसरा, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा हे प्रयत्नशील आहेत.