क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन जागतिक दर्जाचे -जी राम रेड्डी 

२३००० नागरिकांनी दिली भेट :२५० बुकिंग 

0

नाशिक ,दि. ३१ ऑक्टोबर २०२३ – क्रेडाई नाशिक मेट्रो ने केलेल्या या एक्स्पो चे आयोजन जागतिक दर्जाचे असून अशा  प्रकारच्या  सफल आयोजनाची नोंद  देशभरातील अन्य शहरातील क्रेडाई च्या शाखानी घ्यावी . क्रेडाई नाशिक व क्रेडाई महाराष्ट्र हे देशभरात अग्रेसर असून एक कुटुंब म्हणून कार्य करणाऱ्या क्रेडाई चे शासनाचे गृह धोरण , समाज तसेच शहराच्या विकासात महत्वाचे स्थान असल्याचे प्रतिपादन क्रेडाई राष्ट्रीय चे सचिव जी. राम रेड्डी यांनी केले.

२६ ऑक्टोबर पासून नाशिक मधील ठक्कर डोम येथे सुरू असलेल्या क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२३ मधील प्रदर्शनाचा आज समारोप झाला. या सांगता कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमासाठी ते हैदराबाद हून आवर्जून उपस्थित होते.

या पाच दिवसीय प्रदर्शनात सुमारे २३००० नागरिकांनी भेट दिली व २५० सदनिकांचे बुकिंग तसेच ६०० हून अधिक साईट व्हिजीट  संपन्न झाल्या. या उत्स्फूर्त प्रतिसादमुळे   नाशिकच्या अर्थकारणावर आगामी कालावधीत सकारात्मक परिणाम दिसणार  आहे.

हा समारोपाचा सोहळा देखील आगळावेगळा असाच होता. आज जे क्रेडाई चे उत्तुंग स्वरूप आहे त्याचा पाया  भक्कम करण्यामध्ये ज्या सर्व माजी अध्यक्षाची मोलाची भूमिका आहे असे सर्व माजी अध्यक्षाची या कार्यक्रमास  प्रमुख उपस्थिती होती. या  सर्वांचा देखील गौरव करण्यात आला. .या माजी अध्यक्षामध्ये  आजमितीला क्रेडाई राष्ट्रीय चे प्रमुख (सल्लागार समिती)  असे पद भूषविणारे जितुभाई ठक्कर , क्रेडाई राष्ट्रीय च्या रियल इस्टेट डेव्हलपमेंट अकॅडमी चे प्रमुख पद भूषविणारे  अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्र  चे उपाध्यक्षपद भूषविणारे सुनील कोतवाल , अविनाश शिरोडे , सुरेश अण्णा पाटील ,किरण चव्हाण , रवी महाजन  हे उपस्थित होते .

सर्वप्रथम सहसमन्वयक ऋषिकेश कोते यांनी उपस्थितांचे स्वागत केले.त्या नंतर आपल्या प्रास्तविक भाषणात बोलताना  समन्वयक अंजन भलोदिया म्हणाले की, या एक्स्पोचे  नियोजन गेल्या एक वर्षापासून सुरू होते . एक्स्पो ने नीटनेटके आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे सफल नियोजन हे टीमवर्क  असल्याचे त्यांनी नमूद केले.

आपल्या मनोगतात  बोलताना क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले की, या एक्स्पो च्या आयोजनाने एक नवीन उंची गाठली असून राज्यातील अनेक शहरातून नागरिक तसेच क्रेडाई पदाधिकारी व सदस्य आवर्जून नाशिक ला प्रदर्शन बघण्यास आले होते . क्रेडाई ने नेहमीच शहर विकास तसेच बांधकामातील विविध घटकांचा नेहमीच विचार केला असून एक्स्पो दरम्यान देखील बांधकाम कामगारांसाठी स्मार्ट कार्ड चे वितरण करण्यात आले.

क्रेडाई च्या आगामी योजनांबाबत बोलताना ते म्हणाले की, नाशिक तसेच नाशिकच्या प्रॉपर्टी ची देशभरात माहिती होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून  क्रेडाई च्या वेबसाईट वर डिजिटल स्वरूपात एक्सपोंची लवकरच सुरुवात करण्यात येईल. या सोबतच नाशिक शहर व जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी देखील एक्स्पो चे आयोजन करण्याची  योजना असून सर्व सदस्यांसाठी मार्केटिंग प्रशिक्षण देखील देण्यात येणार असल्याचे त्यानी सांगितले.

प्रदर्शनास भेट दिलेल्या नागरिकांतून काहीं भाग्यवंत नागरिकांची निवड लकी ड्रॉ द्वारे करण्यात आली . सह समन्वयक नितीन पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष दिपक बागड, सुजॉय गुप्ता, जयंत भातंब्रेकर, नरेश कारडा, मानद सचिव गौरव ठक्कर, खजिनदार हितेश पोद्दार, सह सचिव सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, अनिल आहेर, मनेजिंग कमिटी मेंबर मनोज खिंवसरा, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा यांनी प्रयत्न केले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.