भीषण कार अपघातात क्रिकेटपटू ऋषभ पंत गंभीर जखमी 

0

नवी दिल्ली,दि.३० डिसेंबर २०२२ – भारतीय क्रिकेट संघाचा  स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे.दिल्ली-डेहराडून महामार्गावर हा अपघात झाला आहे. कार रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.कारचा चक्काचूर झाला असून आग लागल्यानंतर संपूर्ण कार जळून खाक झाली.हम्मदपूरजवळ अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आपल्या आई बरोबर नवं वर्ष साजरे करण्यासाठी ऋषभ दिल्लीहून आपल्या घरी निघाला होताअपघातावेळी ऋषभ स्वत: गाडी चालवत होता आणि कारमध्ये तो एकटाच होता. ज्याठिकाणी हा अपघात घडला, ती जागा अपघातप्रवण क्षेत्र असल्याचं म्हटलं जातंय. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहेत.रुडकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारानंतर ऋषभला देहरादूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.

ऋषभवर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. ऋषभची कार रेलिंगला धडकली आणि त्यानंतर कारला आग लागली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. आज सकाळी ऋषभ त्याच्या गाडीने दिल्लीहून रुडकीच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी हा भीषण अपघात झाला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!