“आदि अनंत विठ्ठला”कार्यक्रमातून रसिकांनी अनुभवली पंढरीची वारी
केशव कथक नृत्यालयाच्या कथक कलावंतांनी सादर केला अभंगावर आधारित अनोखा नृत्याविष्कार
नाशिक, १७ मे २०२५ – Cultural Events in Nashik नाशिकच्या कालिदास कला मंदिरात केशव कथक नृत्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “आदि अनंत विठ्ठला” या कथक नृत्याविष्कारातून नाशिककर रसिकांनी भक्तिभावाने परिपूर्ण पंढरीची वारी अनुभवली.
(Cultural Events in Nashik) कार्यक्रमाची सुरुवात नृत्यालयाचे संस्थापक रोहित जंजाळे यांनी सादर केलेल्या पांडुरंगाष्टकम ने झाली. त्यानंतर एकापेक्षा एक सुंदर कथक सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसात न्हालं.
कार्यक्रमाला कथक गुरू डॉ. सुमुखी अथनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. नृत्यालयाच्या जुन्या व नव्या विद्यार्थिनींनी एकत्र येत कानडा राजा पंढरीचा, अवघे गर्जे पंढरपुर, टाळ बोले चिपळीला, विठू माऊली तू, देह विठ्ठल, माझे माहेर पंढरी अशा अकरा भावस्पर्शी अभंगांवर प्रभावी नृत्य सादर केलं.
गायक हर्षद गोळेसर व गायिका दुहीता गोळेसर यांच्या सुमधुर गायकीने कार्यक्रमात रंगत आणली.तालवादनासाठी व्यंकटेश तांबे (तबला), कृष्णा नवगीरे (पखवाज), विधान बैरागी (कीबोर्ड) आणि तन्मय उनवणे (टाळ) यांची उत्कृष्ट साथ लाभली.ध्वनि संयोजन पवन वंजारी तर प्रकाशयोजना आर्या शिंगणे यांनी केली. कार्यक्रमासाठी भूषण कुलकर्णी (श्रीमद केटरर्स) यांचे विशेष सहकार्य लाभले.
[…] झाला असून, सोमवार दिनांक २ जून रोजी “कृतज्ञता सन्मान पुरस्कार” सोहळा सायंकाळी ६.१५ ते ९ या वेळेत […]