नाशिकमध्ये ११०० रामभक्तांचा अभूतपूर्व ‘श्री राम गीत गायन’ महोत्सव

२२ मार्च २०२६ रोजी भव्य आयोजन

0

नाशिक ,दि, २४ जानेवारी २०२६ – Cultural Events in Nashik “रामो राजमणि: सदा विजयते” या दिव्य घोषाने नाशिक नगरी पुन्हा एकदा भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी, तर नाशिक ही त्यांची तपोभूमी मानली जाते. अशा पुण्यपावन नगरीत श्रीरामभक्तांसाठी एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व धार्मिक-सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.नाशिकमधील ‘रसिक सूर’ या भक्ती-संगीत चळवळीच्या माध्यमातून भव्य श्री राम गीत गायन सेवा येत्या रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात ११०० रामभक्त-साधक एकत्र येऊन सामूहिक रामगीत गायन करणार असून, हा एक विक्रम ठरण्याची शक्यता आहे.कोदंडधारी श्रीरामाच्या साक्षीने भक्तीचा महासोहळाहा भव्य दिव्य सोहळा भोसला मिलिटरी स्कूल मैदान, कॉलेज रोड, नाशिक येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संपन्न होणार आहे. कोदंडधारी श्रीरामांच्या साक्षीने होणारा हा कार्यक्रम भक्तांसाठी एक अलौकिक आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे.या रामगीत गायन सेवेत नाशिकमधील १८ वर्षांवरील कोणताही रामभक्त सहभागी होऊ शकतो. विशेषतः शाळा-महाविद्यालयातील शिक्षक, संगीतप्रेमी, गायक, साधक आणि रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.‘

रसिक सूर’चा भक्तीसेवेचा संकल्प‘(Cultural Events in Nashik)

रसिक सूर’ या व्यासपीठाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून भक्ती, संगीत आणि संस्कृती यांचा संगम साधण्याचे कार्य सुरू आहे. श्रीराम गीत गायन ही केवळ एक सांस्कृतिक मैफल नसून, ती श्रीरामसेवेचा एक भक्तिपूर्ण यज्ञ असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.या सेवेद्वारे प्रभू श्रीरामांच्या कृपेने भक्तांना आध्यात्मिक समाधान मिळावे, समाजात भक्तीभाव, एकात्मता आणि संस्कार रुजावेत, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.नोंदणी आवश्यक; नाममात्र देणगीतून सहभागया भव्य रामगीत गायन सेवेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, सहभागासाठी नाममात्र देणगी ठेवण्यात आली आहे. इच्छुक रामभक्तांनी वेळेत अर्ज भरून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क माहिती  अनघा धोडपकर

मोबाईल : 8652056990 / 8169383474

नाशिकसाठी अभिमानाचा क्षण

श्रीरामभक्तीचा असा विराट सोहळा नाशिकमध्ये होत असून, ११०० भक्त एकत्र येऊन रामनामाचा गजर करणार असल्याने हा कार्यक्रम नाशिकच्या धार्मिक-सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाण्याची शक्यता आहे. सर्व रामभक्तांनी या पुण्यकर्मात सहभागी होऊन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!