रावसाहेब आणि मुक्ता मध्ये खरी लढाई सुरु होणार !

0

मुंबई,२ डिसेंबर २०२२ – येत्या ५ डिसेंबरपासून ‘दार उघड बये’ चा ऍक्शन पॅक आठवडा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे, पुरुषी मक्तेदारीला छेद देऊन घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी मुक्ता झटणार आहे. या मालिकेत रोज काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतोय. मुक्ता सारंगचा गृहप्रवेश झाल्यानंतर रावसाहेब मुक्ताच्या पावलांचा ठसा असलेलं कापड जाळून टाकतात. कोंडून ठेवलेल्या सारंगच्या आईला म्हणजेच वैजयंतीला रावसाहेब सारंग आणि मुक्ताला भेटू देत नाहीत. तर इकडे आर्याचे आई बाबा नगरकरांच्या घरी येतात, रावसाहेब त्यांना शब्द देतात की आर्याच नगरकरांची सून म्हणून या घरात दिसेल आणि तसं झालं तर मी स्वतः रावसाहेब बाईचा वेश घालून हातात बांगड्या भरून दिवसभर घरात फिरेन.

रावसाहेब मुक्ता-सारंगसमोर प्रत्येकवेळी नवीन आव्हानं उभी करणार आहेत आणि या आव्हानांना मुक्ता सडेतोड उत्तर देणार आहे, यात तिला नवऱ्याची म्हणजेच सारंगची साथ मिळणार आहे, मुक्ता ने स्विकारलेल्या प्रत्येक आव्हानांमुळे कुठंतरी रावसाहेबांचा पुरुषी अहंकार दुखावला जाऊन ते अतिशय खालच्या पातळीला उतरणार आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे रावसाहेब स्वतःला घरातल्यांसमोर बाईच्या वेशात हातात बांगड्या घालून फिरताना आरशात बघणार आहेत. ५ डिसेंबरपासून रावसाहेब आणि मुक्ता मधील खरी लढाई सुरु होणार आहे.

त्यामुळे मुक्ता पुरुषी मक्तेदारीला छेद देणार का? सोबत घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देणार का? मुक्ता समोरील आव्हानांना तिला सारंगची साथ कशी मिळेल. या सर्व उत्तरांसाठी पाहायला विसरू नका “दार उघड बये” चा ऍक्शन पॅक आठवडा ५ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. झी मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!