आजचे राशिभविष्य-शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५
१ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक Daily Horoscope in Marathi
🔯 श्रावण शुक्ल अष्टमी | स्वाती नक्षत्र | तुळ राशी चंद्र | वर्षा ऋतू
🕒 राहुकाल: सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
🕯️ विशेष: लोकमान्य टिळक पुण्यतिथी
🌈आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ. (विष्टी करण शांती)
Daily Horoscope in Marathi
🔥 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
चंद्र-गुरूचा त्रिकोण योग मनाला प्रसन्नता देईल. घरगुती शुभकार्याची चाहूल लागेल. वाहनसुख लाभेल. पण भावनांवर नियंत्रण ठेवा, गैरसमज टाळा.
💰 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आकस्मिक आर्थिक लाभ संभवतो. जुनी थकलेली कामं मार्गी लागतील. आरोग्यावर विशेष लक्ष ठेवा. नवीन कर्ज घेणे टाळा.
📚 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, ह)
संत-महंतांची भेट होण्याची शक्यता. ज्ञानात वाढ होईल. बोलताना काळजी घ्या, संभ्रम निर्माण होऊ शकतो. वरिष्ठांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही.
🏠 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
स्वप्नपूर्तीचा दिवस. पावसासारखं समाधान लाभेल. दानधर्मास प्राधान्य द्या. पण घरखरेदीसंबंधी निर्णय पुढे ढकलणे योग्य.
🌞 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
वास्तू विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. पण व्यावसायिक निर्णय घेताना अचूक माहिती मिळवावी. सन्मानाची अपेक्षा कमी ठेवा.
⚙️ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल दिसतील. वरिष्ठांच्या विश्वासास पात्र व्हाल. काही अडचणी आल्या तरी संयम राखा.
🌈 तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
स्वतःच्या राशीत चंद्र! दिवस विशेष प्रसन्न करणारा. धार्मिक कार्यात मन लागेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढेल. गुरूयोग मन:शांती देईल.
⚠️ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
अस्थिर ग्रहमान. महत्वाची कामं पुढे ढकलावीत. कायदेशीर प्रश्न किंवा सरकारी बाबतीत सावधगिरी बाळगा. प्रवासात दक्षता आवश्यक.
🎯 धनु (ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे)
मनासारखे दिवस! सर्व बाजूंनी यश मिळेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. दांपत्य जीवनात समाधान. पण घरातील वृद्धांची प्रकृती बिघडू शकते.
✈️ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कामाच्या निमित्ताने दूरगामी प्रवास संभवतो. परदेशगमनाचे स्वप्न साकार होऊ शकते. आर्थिक व्यवहारात संयम आवश्यक.
🧿 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
गुरूचा प्रभाव आणि चंद्राची साथ – दोनही सकारात्मक. महत्वाची कामं पार पडतील. नशीब साथ देईल. घरगुती सौख्य वाढेल.
💡 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
चंद्र अष्टम स्थानात असल्याने भावनिक अस्थिरता वाढू शकते. वादात न पडता वेळ सत्कारणी लावा. आपले म्हणणे शांतपणे मांडा.
१ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. कल्पकता, चपळता, हुशारी हे गुण तुमच्यात उपजतच आहेत. तुम्ही निसर्गाशी सहज एकरूप होतात. जीवनाचा आनंद उपभोगतात. स्वभाव काहीसा शंकेखोर आहे. निर्णय घेण्यास उशीर लागतो. सामाजिक कामाची तुम्हाला आवड असली तरी जीवनात तुम्हाला एकटेपणा जाणवतो. तुम्ही एकनैसर्गिक कलाकार असून स्वभाव हरहुन्नरी आहे. तुम्हाला कोणत्याही विषयाचे चटकन आकलन होते. तुमचा इतरांवर चांगला प्रभाव पडतो. तुम्ही सभा गाजवू शकतात. तुम्हाला नातेवाईकांमुळे त्रास होऊ शकतो आणि एखाद्या आजारी माणसाची जबाबदारी तुमच्यावर पडते. तुम्ही सुखी, तेजस्वी , अहसवादी आणि ध्येयवादी आहात. तुमच्यात संशोधन करण्याची शक्ती आहे. तुमचा मानसशास्त्राचा अभ्यास चांगला असतो. गूढ गोष्टींची आवड असते. तुम्ही नेतृत्व करणारे आहेत मात्र कल्पनाविलासात रमणे तुम्हाला जास्त आवडते. कोणताही विषय ठराविक पद्धतीने हाताळणे तुम्हाला आवडते. शास्त्र, संशोधन, शोध प्रबंध यात तुम्हाला रस असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः आणि त तेही झटपट घेतात. विविध मैदानी खेळांची आवड असते. तुम्ही अत्यंत उतावीळ असतात. इतरांची सिक्रेटस तुम्ही जपून ठेवतात. त्याचा गैरवापर किंवा उच्चार
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शक, मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, कॅन्टीन, बँकिंग, सेल्स मॅनेजर, पुस्तक विक्रेता, आणि आयात निर्यात अधिकारी.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, मंगळवार.
शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, जांभळा.
शुभ रत्न:- माणिक, पुष्कराज, अंबर.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
📞 विशेष मार्गदर्शनासाठी संपर्क:
🧙♂️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📱 8087520521
