आजचे राशिभविष्य – रविवार, २२ जून २०२५

२२ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Daily Horoscope in Marathi)
🕓 राहुकाळ – दुपारी ४:३० ते संध्याकाळी ६.००
🌿 “आज संध्याकाळी ६ पर्यंत चांगला दिवस आहे” – भगवंत एकादशी विशेष
📅 ज्येष्ठ कृष्ण द्वादशी | शके १९४७ | संवत २०८१ | दक्षिणायन | वर्षा ऋतू
🌌 नक्षत्र – भरणी / कृतिका
👶 आज जन्मलेल्या बालकाची राशी – मेष (रात्रि ११.०४ नंतर वृषभ)
(Daily Horoscope in Marathi)

🐏 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
💫 शुभ दिवस. प्रेम, सहल, आनंद यांचा संगम.
टिप: भावनांमध्ये वाहून न जाता निर्णय घ्या.
🔮 प्रणयरम्य दिवस, खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा.

🐂 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
💫 चैनीची आवड पूर्ण कराल. खर्च वाढेल.
टिप: आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवा.
🔮 वाहन सुख आणि काहीतरी वेगळा निर्णय संभवतो.

👬 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
💫 नवीन खरेदी, भेटवस्तू आणि मजा-मस्तीचा दिवस.
टिप: नातेवाईकांशी वेळ घालवा.
🔮 खरेदीसाठी उत्तम वेळ आहे.

🦀 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
💫 प्रेमात यश, लाभाचे योग.
टिप: भावनात्मक स्थैर्य ठेवा.
🔮 प्रेमसंबंध आणि अचानक लाभ.

🦁 सिंह (मा, मी, मु, मे, मो, टा, टी, टू, टे)
💫 नेतृत्वाची संधी, कलाकारांना यश.
टिप: आत्मविश्वास दाखवा, संधी साधा.
🔮 भागीदारी लाभदायक ठरेल.

👧 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
💫 काही अप्रत्याशित सुखद अनुभव. सावध पावले टाका.
टिप: आर्थिक नियोजन करून पुढे चला.
🔮 थोडी काळजी पण संधीही मिळेल.

⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
💫 शेती, कला आणि खर्च यांचं योग्य संतुलन.
टिप: भावनिक आनंदासाठी वेळ द्या.
🔮 गायन-वादनामुळे मन प्रसन्न राहील.

🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
💫 भाग्य साथ देईल. प्रगतीची दिशा ठरेल.
टिप: गरजूंसोबत वेळ घालवा, समाधान लाभेल.
🔮 पाणथळ जागेचा लाभ.

🏹 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
💫 लॉटरी, प्रवास, लाभाचे योग.
टिप: संधी मिळाल्यावर मागे हटू नका.
🔮 संवादात यश व छोटा प्रवास.

🐐 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
💫 शेती, जमीन व्यवहार, अन्नधान्य वृद्धी.
टिप: वाहन चालवताना दक्षता घ्या.
🔮 सामोपचाराचे महत्त्व पटेल.

🌊 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
💫 धनलाभाची संधी, अचानक लाभ.
टिप: बुध्दीचा वापर करा, निर्णय न घाईघाईने घ्या.
🔮 योजना यशस्वी होतील.

🐟 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
💫 योजना सफल, धार्मिक कार्यात गुंतवणूक.
टिप: आध्यात्मिक शांतीसाठी वेळ राखा.
🔮 घरगुती वातावरण सुखद राहील.

२२ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर हर्षल, शुक्र आणि बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. बोलके डोळे आणि उत्तम शरीरयष्टी हे तुम्हाला वरदान आहे. स्वभाव अस्थिर असतो. अनपेक्षित निर्णय घेतात. भिन्नलिंगी व्यक्तींपासून तुम्हाला फायदा होतो. मित्र परिवार मोजका असतो. तुम्ही रुबाबदार आहात. आयुष्यातील 40 ते 61 हा कालावधी अत्यंत महत्वाचा असतो. जीवनाचा पूर्वार्ध कष्टात जातो मात्र उत्तरार्ध आनंदात व्यतीत करतात. अनेकदा तुमच्या वागण्यात विरोधाभास जाणवतो. तुम्हाला अनेक विलक्षण आणि अनपेक्षित घटनांचा अनुभव येतो त्यामुळे तुम्ही जीवनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे. तुमच्यामध्ये व्यापारी वृत्ती आणि तल्लख पणा आहे. तुमची विचारसरणी शास्त्रीय आणि तर्कशुद्ध आहे. तुमच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे. हातात घेतलेल्या कार्यात तुम्ही पूर्वनियोजन करून उत्तम यश मिळवतात. तुम्हाला नाविन्याची आणि प्रवासाची आवड आहे. आपल्या आयुष्यात सतत बदल असावा असं तुम्हाला वाटत राहते त्यामुळे तुमचे घर, नोकरी आणि मित्रपरिवार देखील बदलत राहतो. तुमच्या वागण्या मध्ये एक ठामपणा आहे. तुम्हाला तुमच्या अहंकारी आणि हट्टी स्वभावामुळे व्यवसायात अडचणी येऊ शकतात.

व्यवसाय:- जाहिरात क्षेत्र, वृत्तपत्र, इंटरियर डिझाईन, बँकिंग, आयात-निर्यात, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, कान नाक डोळे तज्ञ, संशोधन.
शुभ दिवस:- सोमवार, शुक्रवार, रविवार.
शुभ रंग:– निळा, पांढरा, जांभळा.
शुभ रत्न:- पाचू, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

📞 व्यक्तिगत कुंडली विश्लेषणासाठी संपर्क करा –
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 📲 8087520521
💎 शुभ रत्ने, शक्तीस्थाने, आजार, जोडीदार स्वभाव जाणून घ्या. सल्ला मिळवा

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!