आजचे राशीभविष्य –मंगळवार,२२ जुलै २०२५
२२ जूलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये
🔮 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Daily Horoscope in Marathi)
🌧️ आषाढ कृष्ण द्वादशी/त्रयोदशी | मृगशीर्ष/आर्द्रा नक्षत्र
📅 शके १९४७ | संवत २०८१ | वर्षा ऋतू | दक्षिणायन
🕒 राहूकाळ – दुपारी ३.०० ते ४.३०
📿 विशेष दिवस – भौम प्रदोष व्रत, संत नामदेव समाधी दिन
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ/मिथुन (ध्रुव योग शांती)
(Daily Horoscope in Marathi)
🔴 मेष (Aries):
चंद्राचा शनी व नेपच्यूनशी केंद्र योग असल्यानं थोडा तणाव जाणवेल. अहंकारामुळे नुकसान होऊ शकते.
✅ उपाय – श्री हनुमान उपासना करा, गरम पाण्यापासून सावध राहा.
💡 टिप – स्वतःला वेळ द्या. मोठे निर्णय पुढे ढकला.
🟢 वृषभ (Taurus):
दिवस संमिश्र आहे. आर्थिक लाभ होतील पण कौटुंबिक वाद उद्भवू शकतात.
✅ उपाय – मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा, झोपण्याच्या ठिकाणी स्वच्छता ठेवा.
💡 टिप – बोलताना संयम ठेवा, स्वतःच्या मतावर ठाम राहा.
🟡 मिथुन (Gemini):
सकाळी खर्च वाढेल पण नंतर चंद्र राशीत येईल. आध्यात्मिक प्रगतीचा योग आहे.
✅ उपाय – गरजूंना अन्नदान करा.
💡 टिप – पावसात वावरताना काळजी घ्या, महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला.
🔵 कर्क (Cancer):
नवीन खरेदी होईल, आनंददायक घटना घडतील. महिलांनी घरातील वाद टाळावेत.
✅ उपाय – ज्येष्ठांचा सल्ला घ्या.
💡 टिप – जलप्रवास किंवा पावसात फारसा वेळ घालवू नका.
🟠 सिंह (Leo):
व्यवसायात यश, आर्थिक लाभ. पण एखादी नकारात्मक बातमी मिळू शकते.
✅ उपाय – नदी व पाणथळ भागांपासून दूर रहा.
💡 टिप – आत्मविश्वासासोबत विनम्रता ठेवा.
🟣 कन्या (Virgo):
दबदबा वाढेल, सरकारी कामे होतील. आक्रमकपणा टाळा.
✅ उपाय – नवे निर्णय घेताना शांत डोक्याने विचार करा.
💡 टिप – प्रतिस्पर्ध्यांचा आदर ठेवा, विनम्रता ठेवा.
🟤 तुळ (Libra):
धार्मिक व गूढ गोष्टींत रस वाढेल. आरोग्याची चिंता भेडसावेल.
✅ उपाय – प्रार्थना व ध्यान करा.
💡 टिप – महिलांनी एकटं फिरताना सावध राहावं.
⚫ वृश्चिक (Scorpio):
मन अस्वस्थ राहील. प्रवासाचे योग. शेअर व्यवहार टाळा.
✅ उपाय – दैवी उपासना करा, संतांचे विचार वाचा.
💡 टिप – कोणताही मोठा व्यवहार विचारपूर्वक करा.
🔶 धनु (Sagittarius):
कामात यश, सहकार्य लाभेल. पाण्याशी संबंधित गोष्टींमध्ये काळजी घ्या.
✅ उपाय – औषधं वेळेवर घ्या, पाणी पिण्याचं प्रमाण योग्य ठेवा.
💡 टिप – कामाचे स्थळ बदलण्याची शक्यता.
⚪ मकर (Capricorn):
चांगला दिवस. व्यवसाय वृद्धी, उत्साह वाढेल. मानसिक थकवा जाणवेल.
✅ उपाय – वाहन जपून चालवा, प्रवास टाळा.
💡 टिप – मानसिक शांततेसाठी ध्यान करा.
🔺 कुंभ (Aquarius):
घरगुती कामात यश. अभ्यासात प्रगती. मनात द्विधा भावना.
✅ उपाय – गळ्याची काळजी घ्या, थंड पदार्थ टाळा.
💡 टिप – महत्त्वाच्या निर्णयासाठी वेळ घ्या.
🔻 मीन (Pisces):
हाती घेतलेले काम पूर्ण होईल. पण वागणूक इतरांना त्रासदायक वाटू शकते.
✅ उपाय – विनम्र राहा, विचारपूर्वक वागा.
💡 टिप – निर्णयात घाई करू नका.
२२ जूलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (Daily Horoscope in Marathi)
तुमच्यावर हर्षल आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या आयुष्यात मोठ्या जबाबदारीची कामे मिळतात. कौटुंबिक जीवन सुखाचे असते. मित्र परिवार अतिशय छोटा असतो. भांडण्याची फिकीर करीत नाही. भावनेची काटकसर करता. बऱ्याच वेळा एकटेपणा जाणवतो. आयुष्यातील ४० ते ६० वर्ष महत्त्वाचे असून यशाच्या सर्वोच्च काळ असतो. भिन्नलिंगी व्यक्ती पासून फायदा होतो. हर्षल व मंगळ या ग्रहांच्या मुळे बऱ्याच वेळा तुमच्या जीवनात विचारात विरोधाभास असतो. हर्षल हा स्फोटक ग्रह असल्यामुळे जीवनात बरेच चढउतार होण्याची शक्यता असते. अनपेक्षित गोष्टी, विलक्षण गोष्टी होतात. कर्तुत्व असूनही विलक्षण घटना घडतात. व्यवसायात अनेक बदल होतात त्यामुळे अस्थिरता निर्माण होते. उत्साह, प्रगती,जोम ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. मनाची पातळी खूप उच्च दर्जाची असते. मानवाच्या कल्याणासाठी बुद्धीचा व कृतीचा उपयोग करतात. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असते खोटेपणा तुम्हाला आवडत नाही. तुमच्या स्वभाव परखड असून दुसऱ्याचे विचार तुम्हाला सहजा सहजी पटत नाही. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे इतर लोक दुखावले जातात व निष्कारण गैरसमज व शत्रुत्व निर्माण होते. तुमच्या कामात कोणाची ढवळाढवळ तुम्हाला आवडत नाही, जर अशी ढवळढवळ कोणी केली तर तुम्ही तुमचे काम सोडून बाहेर पडतात. डोके शांत ठेवून काम केल्यास आयुष्यात यश मिळते. पण हट्टीपणा आणि उद्धटपणा यामुळे अडचणी येऊ शकतात. वृत्तीने निर्भीड असून कोणत्याही धोक्यास तोंड देण्यात तुम्ही तयार असतात. जीवनात सतत बदल असावा असे तुम्हाला वाटते. घरातील व कौटुंबिक संबंधातून व नातेवाईकांपासून तुम्हाला त्रास होतो. आयुष्यात अनेक अडचणी आणि विलंब असूनही पैशाच्या बाबतीत तुम्ही समाधानी असतात. तुम्ही तल्लख व आकर्षक आहात. तीव्र इच्छाशक्ती असून नीटनेटकेपणा चांगल्या कपड्यांचे शौकिन असतात. महत्त्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी तुम्ही होता. आपल्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करतात. घरातील सजावट उत्तम असावी असे तुम्हाला वाटते. बऱ्याच वेळा स्वतःचा वरचढपणा दाखवण्याची लहर येते. काही वेळा चमत्कारिक स्वभावामुळे सबंध दिवस खराब जातो. तुम्हाला आपल्या घराबद्दल आपले पण आहे परंतु ओढा नाही. बऱ्याच वेळा तुम्ही अस्वस्थ असतात, अशावेळी एक किंवा दोन भाग्यांक असलेल्या व्यक्तीच्या सानिध्यात तुम्ही राहणे फायदेशीर ठरते .
शुभ दिवस:- रविवार ,सोमवार शुक्रवार, शनिवार
शुभ रंग:- पांढरा, निळा, गुलाबी
शुभ रत्न:- हिरा,मोती, पोवळे
(रत्ने घेण्यापूर्वी पत्रिका नीट तपासून घ्या)
📝 विशेष सूचना:
राशी हे मार्गदर्शन आहे, भविष्य तुमच्या कृतीवर अवलंबून असते.
कुंडली विश्लेषण, विवाह, व्यवसाय, आरोग्य, रत्न सल्ला यासाठी संपर्क करा –
📞 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521

[…] श्रावण शुक्ल अष्टमी | स्वाती नक्षत्र | तुळ राशी चंद्र | […]