आजचे राशीभविष्य – मंगळवार, १० जून २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक Daily Horoscope in Marathi
🌕 विशेष दिन: वटपौर्णिमा – सतीसावित्रीच्या व्रताचे महत्व
📜 तिथी: ज्येष्ठ पौर्णिमा | शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसुनाम संवत्सर
🌙 चंद्र नक्षत्र: अनुराधा/ज्येष्ठा
🕒 राहू काळ: दुपारी ३.०० ते ४.३०
👶 आज जन्मलेली राशी: वृश्चिक (विष्टी करण – शांती आवश्यक)
🪔 टीप: आज दुपारी १२ वाजेपर्यंत शुभ काळ आहे.

🌟 राशिभविष्य:(Daily Horoscope in Marathi)
♈ मेष (Aries Horoscope Today in Marathi)
अष्टमस्थानी चंद्र. शत्रूंचा पराभव होईल. स्त्रीधन वृद्धिंगत होईल. अनैतिक निर्णयांपासून दूर राहा.
Tip: कुटुंबातील महिलांचा सल्ला ऐका.

♉ वृषभ (Taurus Rashi Bhavishya)
संमिश्र दिवस. आर्थिक लाभ होईल. जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. संभ्रम टाळा.
Tip: मोठे निर्णय रात्री न घेणे चांगले.

♊ मिथुन (Gemini Horoscope in Marathi)
दिवस अनुकूल. सुखद अनुभव, प्रवास व आर्थिक लाभ. अध्यात्मिक प्रगतीस चालना.
Tip: ध्यानधारणा केलीत तर शांतता लाभेल.

♋ कर्क (Cancer Rashi Bhavishya)
घरगुती जबाबदाऱ्या पार पडतील. शेअर्समध्ये लाभ. अचानक धनलाभ.
Tip: आर्थिक गुंतवणूक करताना वरिष्ठांचा सल्ला घ्या.

♌ सिंह (Leo Rashi Today)
अर्थकारण मजबूत होईल. येणी वसूल. नोकरीतील त्रास जाणवू शकतो.
Tip: संयम ठेवा, नकारात्मकतेपासून दूर राहा.

♍ कन्या (Virgo Horoscope Today)
आरोग्य सुधारेल. व्यवसायात यश. आर्थिक लाभ. तुमचा अंदाज अचूक ठरेल.
Tip: आजचा दिवस गुंतवणुकीस योग्य आहे.

♎ तुळ (Libra Rashi Bhavishya)
यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कलाकारांसाठी उत्तम दिवस.
Tip: व्यासपीठावर बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा.

♏ वृश्चिक (Scorpio Horoscope in Marathi)
अनुकूल दिवस. भागीदारी व्यवसायात यश. आत्मविश्वास व भरभराट.
Tip: भागीदारीतील नफा समानतेने वाटा.

♐ धनु (Sagittarius Rashi Today)
संमिश्र ग्रहमान. अप्रिय अनुभव येतील. खर्च वाढेल. प्रवासाचे नियोजन बदलेल.
Tip: खर्चावर नियंत्रण ठेवा, अडचणी टळतील.

♑ मकर (Capricorn Horoscope in Marathi)
लाभ स्थानात चंद्र. बढतीचे योग. नोकरीत चांगल्या घटना.
Tip: शेअर्समध्ये निर्णय घेताना संयम ठेवा.

♒ कुंभ (Aquarius Rashi Bhavishya)
अनुकूल दिवस. आनंद मिळेल. जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा. कामाचा वेग वाढेल.
Tip: नवीन संधींसाठी उघडे राहा.

♓ मीन (Pisces Horoscope Today)
संमिश्र दिवस. अति धाडस टाळा. दानधर्म करा. सिद्धी प्राप्त होईल.
Tip: शांत मनाने निर्णय घ्या, धार्मिक कार्यात सहभागी व्हा.

१० जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर रवि, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही इतरांची परीक्षा झटकन करू शकतात. तुमचा सल्ला योग्य असतो. तुम्ही अत्यंत अभ्यासू असून नीटनेटके आहात. तुम्ही जबाबदारीच्या जागांवर चांगले काम करू शकतात. तुमचा स्वभाव काहीसा बढाईखोर आहे. तुम्ही इतरांना मदत करतात मात्र इतरांकडून तुम्हाला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. तुम्ही दर्जेदार वस्तूंचा आग्रह धरतात. तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुम्हाला शास्त्राची आवड आहे. तुमची वृत्ती व्यापारी आहे आणि तुम्ही झटपट काम करतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. खेळण्याची हौस आहे. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला आवड आहे. तुम्ही जे कार्य हातात घेतात त्यात तुम्हाला यश मिळते कारण तुमचे नियोजन चांगले असते. तुम्हाला गूढ विद्यांची देखील आवड आहे. तुम्ही कलाकार आणि कलाप्रिय आहात. सौंदर्याबद्दल तुम्हाला नैसर्गिक आकर्षण आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही लोकप्रिय असतात. नीती आणि आणि अनीती याबद्दल तुमच्या कल्पना जरा वेगळ्या आहेत. तुम्ही सतत उद्योग मग्न असतात. तुम्ही कायम उत्साह मूर्ती असतात. इतरांचा तुम्ही आदर करतात. इतरांना तुम्ही तणावापासून मुक्त करतात. तुम्ही फार सखोल अभ्यास करणारे जरी नसले तरी तुमचे वक्तृत्व चांगले असते. इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही काम करत असतात. तुम्ही संशोधक असाल आणि त्याचा जगाला कसा फायदा होईल याचा विचार करतात. तुम्ही जसे व्यवहारी आहात तसे दानधर्म करणारे देखील आहात. तुम्ही हट्टीपणा आणि उतावळेपणा टाळला पाहिजे.

व्यवसाय:-जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, चित्रपट निर्माते, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, इंटेरियर डिझायनर, दिग्दर्शक, बँकिंग, औषधाचे दुकान, वैद्यकीय क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स, वकिली.
शुभ दिवस: सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, हिरवा.
शुभ रत्न:- पाचू, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

📞 कुंडली परीक्षण व वैयक्तिक मार्गदर्शनासाठी संपर्क करा:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!