मुंबई, दि. १८ सप्टेंबर २०२५ – Dashavatar Marathi Movie सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत गाजत असलेला ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट ‘दशावतार’ याच्या कलावंतांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विशेष निमंत्रण दिले. या प्रसंगी मुख्यमंत्री सावंत, गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात आले.
मुख्यमंत्री सावंत यांनी चित्रपट टीमचे अभिनंदन करताना सांगितले की,
“सिंधुदुर्ग आणि कारवारसारखाच दशावतार हा कलाप्रकार गोव्यातही लोकप्रिय आहे. या चित्रपटामुळे ही लोककला जागतिक पातळीवर पोहोचत असल्याचा मला अभिमान वाटतो.”
यावेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.
दिग्दर्शकाचा अभिमान (Dashavatar Marathi Movie)
चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सांगितले, “एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण देणे, हे आमच्या संपूर्ण टीमसाठी मोठा सन्मान आहे. आम्ही कुडाळ आणि गोवा बॉर्डर परिसरात चित्रीकरण केले असून, या चित्रपटाला गोव्याच्या प्रेक्षकांचा तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.”
कलाकारांचा भव्य मेळा
झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटात दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसह महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर आदी कलाकार झळकत आहेत.
प्रेक्षकांचा झंझावाती प्रतिसाद
कोकण, सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारा हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर आणि परदेशातही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत, मराठीबरोबरच अमराठी रसिकही या चित्रपटाला उत्स्फूर्त दाद देत आहेत.
चित्रपटाचा विषय सार्वत्रिक असल्यामुळे तो भाषेच्या आणि प्रांताच्या चौकटी मोडून “चित्रभाषेच्या माध्यमातून सर्वांना भिडणारा” ठरत आहे. त्यामुळेच ‘दशावतार’ हा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक भव्य पर्व ठरत आहे.
[…] […]
[…] आणि सुबोध खानोलकर लिखित-दिग्दर्शित ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर […]