नाशिक – हिमाचल प्रदेशात ट्रेकिंगसाठी गेलेल्या नाशिक शहरातील तरूणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. कौस्तुभ हुदलीकर (वय-३०) असे त्याचे नाव असून सुप्रसिध्द कवी, लेखक, गीतकार तथा सावाना सांस्कृतिक समिती सदस्य संतोष हुदलीकर यांचा तो मुलगा आहे.
कौस्तुभ आपल्या मित्रांसह हिमाचल प्रदेशातील स्वीपी जिल्ह्यातील काझा व्हॅली येथे ट्रेकिंग साठी गेला होता.काल सकाळी त्यांनी ट्रेकिंगला सुरुवात केली. उंचीवर असल्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याला श्वसनाचा त्रास जाणवू लागला त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्याची प्राणज्योत मालवली कौस्तुभ च्या अकाली निधनाच्या वार्तेने शहरभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, कौस्तुभचे पार्थिव हिमाचल प्रदेशातून दिल्ली मार्गे विमानाने आज रात्री मुंबई येथे आणणार असून त्याचे पार्थिव नाशिकमध्ये पहाटे पर्यंत पोहचणार आहे .उद्या (२७ ऑगस्ट २०२२) सकाळी त्याच्या पार्थिवावर नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.कौस्तुभच्या पश्चात आई ,वडील, बहीण पत्नी एक वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.०