कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट: जिल्ह्यात कोरोनाचे २४२ तर शहरात १३८ नवे रुग्ण
मागील २४ तासात :८२५ कोरोना मुक्त : ऍक्टिव्ह रुग्णसंख्या २४६८ : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ % : ४ जणांचा मृत्यू
नाशिक – नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठाप्रमाणात घट झाली असून आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २४२ कोरोना बाधित रुग्ण आढळले.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या १३८ झाली तर जिल्ह्यात आज ८२५ जण कोरोना मुक्त असून आज जिल्ह्यात कोरोनामुळे आज ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज १९०४ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.
सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात १३८ तर ग्रामीण भागात ८३ मालेगाव मनपा विभागात २ तर बाह्य १९ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९८.२७ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण २४६८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ६१८ जण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –
नाशिक शहरात ९८.२७ %, नाशिक ग्रामीण मधे ९६.५७ %, मालेगाव मध्ये ९७.१७ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.५४ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ %इतके आहे.
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-४
नाशिक महानगरपालिका- ०२
मालेगाव महानगरपालिका-०२
नाशिक ग्रामीण-००
जिल्हा बाह्य-००
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८८६०
नाशिक शहरात एकूण मृत्यू – ४०८५
सध्या उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १९
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ६६४
३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १२
४) मालेगाव मनपा रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २९
५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१७४४
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – १९०४
आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण
लक्षणे असलेले रुग्ण – ४९८
लक्षणे नसलेले रुग्ण – १९७०
ऑक्सिजन वरील रुग्ण – ८५व्हेंटिलेटर वरील रुग्ण – ३०
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)
https://janasthanonline.com/wp-content/uploads/2022/02/AGE-SEX-TEMPLATE-POSITIVE-10-FEB-22.pdf