नवी दिल्ली,दि, १६ फेब्रुवारी २०२४ – राजधानी दिल्लीमध्ये अलीपूर भागातील दयालपुर मार्केट मध्ये एका पेंट फॅक्टरीला गुरुवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत यात ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर एका पोलीस कॉन्स्टेबलसह ४ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आगीचे कारण शोधले जात आहे.
दिल्लीतील अलीपूर भागात असणाऱ्या पेंट फॅक्टरीला भीषण आग लागली होती ही आग एवढी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांना आणि जवानांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. जवळपास ४ तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या आगीत पाच दुकाने आणि वाहनेही जळून खाक झाली.आगीचे कारण कळू शकलेले नाही. फरार कारखाना मालक अखिलचा शोध सुरू आहे.मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
#WATCH | Delhi: Search operation underway after a fire broke out at a Paint factory in Alipur yesterday, killing 11 people.
As per Director of Delhi Fire Services, Atul Garg, "2 more persons are likely trapped" pic.twitter.com/HKUT0yT8UL
— ANI (@ANI) February 16, 2024