नाशिक – देवळा तालुक्यातील लोहणेर येथे प्रेयसी व तिच्या कुटुंबाने पेटवलेल्या प्रियकराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणी व तीचे आई-वडील आणि दोन भाऊ यांनी मुलाच्या गावात जाऊन त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी हा प्रकार घडला होता. या घटनेत प्रियकर तरुण ८० टक्के भाजल्याची माहिती समोर आली होती.काल रात्री ११ वाजेच्या सुमारास या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
लोहणेर येथील घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.या प्रकरणी मुलीसह तिच्या घरच्यांना देवळा पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उचारासाठी दाखल केलेल्या त्या युवकाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली काल रात्री त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सात वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर झालेला ब्रेकअप आणि आपले इतरत्र ठरलेले लग्न मोडल्याच्या संशयातून प्रेयसीने प्रियकर गोरख बच्छाव याच्या अंगावर पेट्रोल टाकून प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याला जिवंत जाळले होते. त्याच्यावर नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटल उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. देवळा पोलिसांनी या प्रकरणी प्रेयसी कल्याणी सोनवणे सह तिचे आई, वडील आणि दोन भाऊ अशा पाच जणांना अटक केली आहे.