शिंदे गटाचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; महायुतीत तणाव शिगेला?

भाजपवर ‘ऑपरेशन लोटस’चा आरोप, फडणवीस–शिंदे मंत्र्यांत बंद दरवाज्यात उच्चस्तरीय चर्चा

0

मुंबई, दि.१८ नोव्हेंबर २०२५ Devendra Fadnavis Cabinet Meeting राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडालेला असताना महायुतीतील तणाव चिघळल्याचं आणखी एक स्पष्ट चित्र आज मंत्रालयात पाहायला मिळालं. नियोजित कॅबिनेट बैठकीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अघोषितपणे बहिष्कार टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजीचा जाहीर फटका दिला. शिवसेनेचे सर्व मंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत बैठकीपासून दूर राहिले, तर फक्त स्वतः शिंदे मुख्यमंत्री म्हणून हजर होते.

बैठक संपताच नाराज मंत्री थेट फडणवीसांच्या दालनात धडकले आणि वातावरण तापलं. “तुम्ही जे करताय ते योग्य नाही…” अशा शब्दांत मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर रोष व्यक्त केला. कल्याणडोंबिवली आणि इतर भागांत भाजपकडून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन लोटस’विरोधात ही नाराजी पातळी गाठल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

कोणते मंत्री गैरहजर?(Devendra Fadnavis Cabinet Meeting)

शिंदे गटातील खालील मंत्री कॅबिनेटला उपस्थित राहिले नाहीत उदय सामंत, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर, भरत गोगावले, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील. यामुळे गटाने एकत्रितपणे बहिष्कार टाकल्याचा स्पष्ट संदेश गेला.

नाराजीची प्रमुख कारणे सहा मुद्दे’ स्पष्ट!

प्री-कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्री उपस्थित असूनही मुख्य बैठकीत त्यांनी अनुपस्थिती दाखवली. यातून नाराजीची दाट छटा दिसत आहे. मंत्र्यांच्या रोषामागील सहा कारणे समोर आली आहेत

1️⃣ भाजपकडून शिवसेना शिंदे गटातील नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर तोडले जात आहेत.

2️⃣ ज्यांच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक लढली, त्याच उमेदवारांना भाजप आता आपल्या पक्षात घेत आहे.

3️⃣ शिंदे गटातील मंत्री/पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता निधी व निर्णय दिले जात असल्याचा आरोप.

4️⃣ स्थानीय निवडणुकीत युतीचा धर्म न पाळता भाजप स्वबळावर उमेदवार उभे करत असल्याचा आरोप.

5️⃣ निधीसाठी शिंदे गटाच्या मंत्र्यांना ‘तारेवरची कसरत’ करावी लागतेय.

6️⃣ कल्याणडोंबिवली, संभाजीनगर, अंबरनाथ, कोकणसह अनेक ठिकाणी भाजपकडून गळाला लावण्याची मोहीम वेगाने.

या मुद्द्यांवर मंत्र्यांनी फडणवीसांसमोर संताप व्यक्त केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. फडणवीसांनीही प्रतिउत्तरात, “उल्हासनगरमध्ये तुम्हीही हेच करता,” असं म्हटल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याणडोंबिवलीतील प्रवेशाने तापला माहौल आज सकाळीच कल्याणडोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.राज्याध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः हजर होते.भाजपने दोन दिवसांपासून हा ‘मोठा प्रवेश’ गुप्त ठेवत सर्व शिंदे समर्थक संपर्कात ठेवले होते.यामुळे शिंदे गटात प्रचंड संताप निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम कॅबिनेट बहिष्कारात दिसून आला.

सुषमा अंधारे यांची जोरदार टीका (Devendra Fadnavis Cabinet Meeting)

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या घडामोडींवर कठोर प्रतिक्रिया नोंदवली.

त्यांनी टीका केलीएकनाथ शिंदे सुरतगुवाहाटीला गेले तेव्हाच भाजप त्यांचा कसोशीने वापर करेल हे कपाळावर लिहिलेलं होतं. आता त्यांच्याच आमदारांच्या विरोधात भाजप आव्हाने उभं करत आहे.”त्यांचा आरोप आणखी गंभीरभाजपला ‘कुबड्या’ नको आहेत असं अमित शाह म्हणतात. पण मागे मात्र शिंदे आणि अजित पवार यांना बाजूला काढण्याचा प्लॅन सुरू आहे.”अंधारे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलं आहे.

आदित्य ठाकरेंची सोशल मीडिया टोलेबाजी:

‘चला, आज परत कोणीतरी गावी जाणार!’**आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण परिस्थितीवर उपहासात्मक पोस्ट करत शिंदे गटाला चिमटा काढला.

त्यांनी म्हटलं

मिंधे टोळीचे मंत्री कॅबिनेटला गेलेच नाहीत! म्हणे राग आलाय… ह्याला म्हणतात ‘चोर मचाये शोर’! मंत्रीमंडळ बैठका जनतेसाठी असतात, तुमच्या रुसव्या फुगव्यासाठी नाही!”शेवटी त्यांनी टोला लगावलाआज परत कोणीतरी गावी जाणार…”ही पोस्ट जोरदार व्हायरल होत असून महायुतीतील वितुष्टाचं चित्र आणखी स्पष्ट होत आहे.

मंत्रालयातील बंद दालनात ‘महत्वाची बैठक

कॅबिनेट संपताच नाराज मंत्री थेट सहाव्या मजल्यावर फडणवीसांच्या दालनात गेले.सध्या त्या दालनात फडणवीसशिंदे गटाची सविस्तर चर्चा सुरू असल्याचं सूत्रांचं सांगणं आहे. मुख्यमंत्र्यांनी नाराजी निवळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

राज्यातील राजकीय भविष्याचा हा महत्त्वाचा टप्पा असू शकतो, कारण

स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर युतीतलं तणावपूर्ण वातावरण

भाजपचा विस्तार आणि शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यात वाढत जाणारे प्रवेश

गटातील मंत्र्यांचा उफाळून आलेला रोष

हे सर्व घटक महायुतीच्या सत्ता समीकरणांवर थेट परिणाम करू शकतात.

राजकीय वर्तुळातील मोठा सवाल

महायुतीत पुढे काय?

राज्यात 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत निवडणुका सुरू आहेत.

अनेक ठिकाणी भाजप एकहाती लढतोय, तर काही ठिकाणी युती तुटल्यासारखी दिसतेय.

शिंदे गटाच्या नाराजीमुळे

➡️ युतीचं भविष्य प्रश्नचिन्हाखाली

➡️ भाजपशिवसेना शिंदे गटातील विश्वासाचा तुटलेला धागा

➡️ निवडणुकांतील ‘जागावाटप’ आणखी गुंतागुंतीचं

राजकीय तज्ञांच्या मते ही फक्त सुरुवात असून, आगामी दिवसांत याचे मोठे पडसाद उमटू शकतात.आजचा कॅबिनेट बहिष्कार महायुतीतील तणावाचं ‘पहिलं अधिकृत लक्षण’ मानलं जात आहे.शिंदे गटाचे मंत्री उघडपणे नाराज दिसत आहेत, तर भाजप प्रवेशमोहीम गतीने सुरू ठेवत आहे.फडणवीसशिंदे यांच्यातील बंद दालनातील चर्चा नेमकं कोणत्या निष्कर्षावर पोहोचते, याकडे राज्याचं राजकीय लक्ष लागलं आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!