महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार 

0

नवी दिल्ली,दि,२९ नोव्हेंबर २०२४ –महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढलेल्या महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवलं. महायुतीने २८८ पैकी २३६ जागा जिंकून ही निवडणूक महायुतीने  एकतर्फी जिंकली. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरुन सुरु असलेला सस्पेन्स आज जवळपास दूर झालाय. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. या बाबत लेकराचं घोषणा होणार आहे.

आज मुंबईत महायुतीची बैठक होणार असून या बैठकीत खाते वाटपा बाबत चर्चा होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी गृहखाते आणि नगरविकास खात्यासह १२ मंत्रिपदे  मागितले असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, याबाबतची माहिती शिंदेंचे निकटवर्तीय असलेले आमदार संजय शिरसाट यांनी गुरुवारी दिली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे, असं शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या अडीच वर्षात आमच्या सरकार पाठबळ दिलं. मी आता सरकार स्थापन कोणतीही अडचण येऊ देणार नाही. मोदी-शाह मुख्यमंत्रि‍पदाबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे भाजपा कडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झाले आहे.

दिल्लीतल्या बैठकीचा अजेंडा काय होता?
मुख्यमंत्रिपदाच्या नावावार शिक्कामोर्तब.
उपमुख्यमंत्री कोण कोण असणार यावर खल.
शपथविधीची तारीख आणि ठिकाण यावर चर्चा.
खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता.
शपथविधी सोहळ्यात कोण कोण शपथ घेणार.
मंत्रिमंडळातल्या संभाव्य नावांवर चर्चेची शक्यता.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.