देवमाणूस नाटकाला झी गौरव आणि मटा सन्मान मिळून ७ नामांकने 

भद्रकाली प्रॉडक्शन निर्मित नाशिकच्या कलावंतांची कलाकृती

0

मुंबई,२१ मार्च २०२३ – झी गौरव साठी नामांकित नाटक “देवमाणूस” हे आपले नाशिकच्या कलावंतांचं व्यावसायीक नाटक असून प्रसाद कांबळी ह्यांच्या भद्रकाली ह्या ४० वर्षांहून अधीक वर्षांची नाटकाची गौरवशाली परंपरा असलेल्या संस्थेची ही ५८ वी नाट्यकृती आहे.

ह्या OUT OF THE BOX नाटकाला झी गौरव आणि मटा सन्मान मिळून ७ नामांकन मिळाली आहेत. ह्यात सर्वोत्कृष्ट नाटक, अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, रंगभूषा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक  म्हणजे जवळजवळ सर्वच विभागात देवमाणूस नाटकाला नामांकन म्हणजे आपल्या नाशिकच्या ह्या नाटकाला मिळालेली दाद आहे.

नाशिकच्या  नाटकाची निवड होणे हे नाशिककरांच्या अभिमानाची बाब आहे. खऱ्या अर्थाने वेगळी वाट शोधून  काहीतरी वेगळं मांडायचा हा प्रयत्न प्रेक्षक देखील आनंदाने स्विकारत आहेत. मुंबई , पुणे, नाशिक ,कणकवली ह्या महाराष्ट्रातल्या तसेच महाराष्ट्राबाहेर इंदौर या ठिकाणी देवमाणूस नाटक बघितल्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून दाद दिली आहे.

ज्येष्ठ लेखक प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर ,ज्येष्ठ अभिनेते सुरेश भागवत , ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, प्रसिद्ध नेपथ्यकार संतोष फुटाणे अशा अनेक मान्यवरांनी देवमाणूस नाटक बघितल्यानंतर ह्या नाटकाचे कौतूक केले आहे.

नुकतेच देवमाणूस या नाटकाने रौप्य महोत्सवी प्रयोगही सादर झाला. सत्य घटनेवर आधारीत देवमाणूस हे नाटक नाशिक मधील डॉ. भरत केळकर यांच्या स्वानुभवावर आधारित कलाकृती आहे.  वेगवेगळ्या कलांचा प्रभावी वापर करण्यात आलेल्या ह्या नाटकाचा नाशिक मधील प्रयोग येत्या शनिवार २५ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वा.  कालिदास कलामंदिर येथे होणार आहे.

झी नाट्यगौरव पुरस्कार २०२३ मध्ये भद्रकालीच्या ५८ व्या नाट्यकृतीला ५ नामांकने….
★ सर्वोत्कृष्ट नाटक – देवमाणूस
★ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – जयेश आपटे
★ सर्वोत्कृष्ट नेपथ्य – हर्षद माने, विशाल नवाथे, अंकुश कांबळी
★ सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – अमोघ फडके
★ सर्वोत्कृष्ट रंगभूषा – सचिन वारीक

देवमाणूस या नाटकाचे लेखन शंतनू चंद्रात्रे यांनी केले आहे तर  नाटकाचे दिग्दर्शन जयेश आपटे ह्यांनी केलेले आहे.  देवमाणूस नाटकातील प्रमुख भुमिका नाशिकचेच कलावंत श्रीपाद देशपांडे साकारत आहेत. ह्यात मुंबईचे दुर्गेश बुधकर , शर्वरी पेठकर आणि  नाशिकचेच कलाकार असलेले प्रणव प्रभाकर , रुतुजा पाठक , आशीष चंद्रचुड हे महत्वाच्या भुमिकेत आहे. देवमाणूस नाटकातील लेखक, दिग्दर्शक, अभिनय व तांत्रिक बाजू हे सर्व कलाकार नाशिक मधून असून ही नाशिकच्या मातीतील कलाकृती आहे ही सांस्कृतीक बाब नाशिककरांचा अभिमान द्विगुणीत करणारी असून नाशिकच्या कला क्षेत्रात मानाचा तुरा खोवणारी आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.