मुंबई – धनंजय मुंडेंना सौम्य झटका आल्याची बातमी पसरली होती.दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा झटका आला नसल्याचं सांगितलं आहे.अजित पवार धनंजय मुंडेंची भेट घेण्यासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला असून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉक्टरांनी दोन ते तीन दिवस दवाखान्यात ठेवण्यास सांगितलं असून आज त्यांना विशेष रुममध्ये हलवण्यात येईल. सर्व तपासण्या सुरु असून काही राहिल्या आहेत. त्यांना विश्रांती घेण्यास सांगण्यात आलं आहे”.धनंजय मुंडे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.धनंजय मुंडे यांची भेट पंकजा मुंडे यांनी नुकतीच घेतली.कट्टर राजकीय शत्रू असलेल्या या बहिण भावांमध्ये यावेळी कौटुंबिक चर्चा झाली. तसेच फार दगदग करू नकोस, काळजी घे, असा सल्लाही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिला.
खा.सुप्रिया सुळेही धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी हॉस्पिटल मध्ये पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेची प्रकृती स्थिर आणि चांगली असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. “राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवास इत्यादीमुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली आहे,” असं टोपे यांनी ट्विटर वरून सांगितलं आहे.
काही काळ आराम करून ते पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने जनतेच्या सेवेत रूजू होतील, असा विश्वासही व्यक्त केलाय. धनंजय मुंडे हे ४६ वर्षांचे असून कामाच्या दगदगीमुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.