गंगापूर धरणातून १० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग : गोदाकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

पालखेड आणि चणकापूर धरणातून मोठा विसर्ग सुरु

0

नाशिक –नाशिक शहर आणि परिसरात गेल्या १५ तासांत नाशिकसह परिसरात ७७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गोदावरीला पूर आला असून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.पावसाचा जोर टिकून असल्याने आज दुपारी २ वाजता धरणातून नदीपात्रात  १०००० क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे .

नाशिक मध्ये मध्ये काल (दि १०) रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेआठ वाजे दरम्यान ७.७ मिलिमीटर पाऊस झाला. यानंतर रात्री साडेदहा ते साडे अकरा दरम्यान ६.४ मिलिमीटर पाऊस झाला. तर रात्री साडेअकरा ते पहाटे ३५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत झाली आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास गंगापूर धरणातून टप्प्या टप्प्याने नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासना तर्फे देण्यात आली आहे.   गंगापुर प्रकल्पाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रामधुन गोदावरी नदीमधे होळकर पुलाजवळ ११२१० क्युसेक्स असा मोठ्याप्रमाणावर विसर्ग सुरु आहे. पावसाचा जोर पुढचे काही दिवस असाच राहणार असल्याने नागरीकांनी खबरदारी घ्यावी  होळकर पुलाजवळ गोदावरी नदीत पाण्याची पातळी वाढणार असल्याने नाशिक शहरातील गोदावरी नदीकाठच्या नागरीकांनी सतर्क रहावे अशा सुचना नागरीकांना प्रशासनामार्फत देण्यात येत आहे.

पालखेड आणि चणकापूर धरणातून मोठा विसर्ग सुरु 
पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरण द्वारपरिचलन पातळी (ROS) पूर्ण झाल्याने व पाण्याची आवक वेगाने वाढल्यामुळे सकाळी ९:०० वा  पालखेड धरणातून विसर्ग वाढवून २०७७० क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.दारणा धरणातून १५०८८ क्युसेक्स,कादवा धरणातून ६७१२ क्युसेक्स,चणकापूर धरणातून आता १४६७९ क्युसेक्स तर नांदूर मध्यमेश्वर मधून ४१६१३ क्युसेक्स विसर्ग वाढविण्यात आला आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात येईल असे हि प्रशासनातर्फे सांगण्यात आले.नदीकाठावरील नागरीकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!