नाशिकरोड (प्रतिनिधी) – आगरटाकळी येथे शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस मध्य विभाग महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती.रंजना गांगुर्डे यांच्या पुढाकाराने श्रमिक श्रेणीतील,असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. ई-श्रम कार्डचे मोफत वाटप करण्यात आले. ई-श्रम कार्डचे मोफत वाटप झाल्याने महिला कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानले.
आगरटाकळी येथील राजवाडा, बुद्धविहार समोर शिवजयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर मेटच्या संचालिका डॉ सौ शेफाली भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, महेश भामरे, बाळासाहेब काठे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ३५१ महिला कामगार, श्रमिक श्रेणीत येणारे कामगार यांना मोफत ई श्रम कार्डचे सौ शेफाली भुजबळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सौ शेफाली भुजबळ म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या दप्तरी सर्व असंघटित कामगार, महिला, मजुरांची नोंद होणार असून विविध सरकारी योजनांचा लाभ त्यांना मिळणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षा योजना व ईतर ही लाभ घेता येऊ शकतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच गरीब होतकरू जनतेच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे सर्व सामान्यांचे होते, अगदी त्याच भावनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेप्रती बांधील आहे. आगरटाकळी भागातील श्रमिक महिला, कामगारांनी मोफत ई श्रम कार्ड योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सौ शेफाली भुजबळ यांनी केले.
सदर उपक्रम नागरिकांच्या सेवेसाठी २ मार्च पर्यंत सुरू राहणार असल्याचे कार्यक्रमाच्या संयोजिका तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या मध्य विधानसभा अध्यक्षा श्रीमती रंजना गांगुर्डे (पगारे) यांनी जाहीर केले. त्यांनी ई श्रम कार्डचे फायदे विषद केले. यावेळी लक्ष्मी सूर्यवंशी, दुर्गा लोखंडे, मुसला लोखंडे, निशा लोखंडे, मंगल पवार, ताई जाधव, अंजना गोधडे, रंजना देशमुख, मंगल झंकर, जयश्री झंकर, संगीता हांडगे, रत्ना जाधव, सुनीता गोधडे, पूजा गोधडे, उषा सोनवणे, रोहिणी भुजबळ, अल्का पगारे, लता पवार, इंदू भोईर, भास्कर लोखंडे आदींसह अनेक लाभार्थी यावेळी उपस्थित होते.