उत्सव नर्तनातून १ नोव्हेंबरला रंगणार दिवाळी पहाट

0

नाशिक  – रचना ट्रस्ट प्रायोजित व अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमी, कलानंद कथक नृत्य संस्था आणि किर्ती कला मंदिर आयोजित ‘दिवाळी पहाट २०२१’ उत्सव नर्तन ‘हा नृत्याचा कार्यक्रम पुन्हा एकवार रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत सादर होत आहे.हा कार्यक्रम नवरचना विद्यालयाच्या प्रांगणात दि. १ नोव्हेबर २०२१ रोजी पहाटे ठीक ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

प्रती वर्षाप्रमाणे कथक नृत्य गुरू रेखा नाडगौडा, संजीवनी कुलकर्णी व विद्या देशपांडे यांच्या विद्यार्थिंनी भारतातील वैविध्यपूर्ण उत्सवांतील नृत्य रसिकांसमोर सादर करणार आहेत. यंदाची दिवाळी अधिक उत्साहात साजरी व्हावी अशी आपणा सर्वांचीच इच्छा आहे व त्याची सुरवात आम्ही या उत्सव नृत्याने होणार आहे. या कार्यक्रमाची सुरवात प्रथे नुसार दिपनृत्याने होईल. गणेशोत्सव, दुर्गोत्सव, रामजन्मोत्सव,  कृष्णजन्मोत्सव, होलीकोत्सव अशा अनेक उत्सवांतील नृत्ये या कार्यक्रमात सादर होतील.

रसिकांनी कोरोना नियमांचे पालन करीत कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.