दिवाळी स्पेशल: खुसखुशीत भाजणीची चकली 

मंदाकिनी ओझरकर 

0

दिवाळी म्हंटले कि फराळ आलाच  .!  त्यात आपल्या आजीनी बनवलेली भाजणीची चकली म्हटली कि तोंडाला पाणीच सुटते आज अशीच चकली आपण घरी बनवू या.. जनस्थान ऑनलाईन आपल्या साठी रोज फराळाच्या पदार्थांची रेसिपी आपल्याला देणार आहे.मग काय रेडिमेड फराळाचे आणण्यापेक्षा आज पासून रोज नवीन फराळाचे पदार्ध घरीच बनवू आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करू.

भाजणीची चकली   
साहित्य -भाजणीसाठी प्रमाण चार वाटी तांदूळ, दोन वाटी चणाडाळ. एक वाटी उडीद डाळ. अधी वाटी मुग डाळ आणि थोडे १ वाटी पोहे जाड किंवा पातळ कोणते ही. पीठाच्या प्रमाणात  जीरे पुड, ओवा, तीळ, हळद, तिखट ( तिखट जास्त टाकू नये ठसका लागतो) आणि तेल,कोथिंबीर.

सर्व डाळी धुवून, एका पातळ कपड्यावर वाळू द्याव्या. त्यानंतर सर्व डाळी मंद आचेवर तांदुळ आणि डाळीचा थोडा रंग बदल पर्यंत भाजाव्या त्यातनंतर पोहे पोहे सुद्धा परतावे  हे सारे गिरणीतून गरमरीत (जाड नाही बारीक नाही)दळून आणावे.

कृती – भाजणीचे पीठ एका भांड्याने मोजून घ्यावे. त्यानंतर जेवढे पीठ त्यानुसार पाणी घालावे . त्यानंतर फोडणी देण्यासाठी (दोन चमचे)तेल गरम करून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर तेलात टाकावी ती कोथिंबीर कुरकुरीत तळली गेल्यावर त्यात ओवा, जीरेपुड तीळ हळद ,तिखट  मीठ टाकावे त्यानंतर पीठ टाकून गॅस बंद करून भांडया वर झाकण ठेवावे. अर्धा पाऊण तासानी पीठ मळून घ्यावे.आणि सोऱ्यानी चकल्या पाडाव्या आणि चकल्या तळण्यासाठी  तेल कढईत घ्यावे तेल गरम झाल्यावर चकल्या तळाव्या..मग काय करणार ना प्रयत्न या वर्षीचा फराळ घरीच करूया ..

मंदाकिनी ओझरकर 
मोबाईल -8600312021
whatsaap 9028491538  

Mandakini Ozarkar
मंदाकिनी ओझरकर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.