नवी दिल्ली,दि ७ एप्रिल २०२५ -. केंद्र सरकारने आज (७एप्रिल) घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या (DomesticLPG gas cylinder prices )दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली आहे.
सरकारी अधिसूचनेनुसार,मंगळवार,८ एप्रिलपासून म्हणजेच आज मध्यरात्री पासूनच एलपीजीच्या दरात प्रति सिलिंडर ५० रुपयांनी वाढ होणार आहे.याआधी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
जे सिलिंडर पीएमयूवायच्या लाभार्थ्यांना आत्तापर्यंत ५०० रुपयांना मिळत होते,ते आता ५५० रुपयांना मिळणार आहेत.त्याचवेळी, गैरलाभार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत ८०३ रुपयांवरून ८५३ रुपयांपर्यंत वाढणार आहे.