तिकीट विक्री केंद्रांना भेट देत डॉ अमोल कोल्हे यांनी शिवप्रेमींचा उत्साह वाढवला
सोमवारचा शो स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिना अर्पण
नाशिक, २३ जानेवारी २०२३ – शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तिकीट विक्री केंद्रांवर महानाट्यातील प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते तथा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विविध विक्री केंद्रांवर स्वतः भेट देऊन तिकीट खरेदीसाठी आलेल्या शिवभक्तांचा उत्साह द्विगुणित केला. दरम्यान सोमवारी झालेला शो स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिना अर्पण करण्यात आला.
शहरातील तपोवन परिसरात केला मैदाननावर २१ पासून २६ पर्यंत दररोज सायंकाळी सहा वाजता भव्यदिव्य रंगमंचावर हे महानाट्य सादर केले जाते आहे. तीनही प्रयोग प्रेक्षकांनी हजेरी लावून भरभरून प्रतीसाद देत यशस्वी केले. छत्रपती संभाजी राजेंचा जाज्वल इतिहास या महानाट्यातून नाशिककरांनी अनुभवला.महानगरात विविध तिकीट विक्री केंद्रांवर सोमवारी (दि. २३) डॉ. अमोल कोल्हे यांनी शिव प्रेमी यांनी खरेदी केलेल्या तिकिटावर स्वतःची स्वाक्षरी देत उत्साह निर्माण केला. राजीव गांधी भवन समोर असलेल्या रेमंड शोरूमच्या तिकीट विक्री केंद्रावर डॉ. अमोल कोल्हे आले होते.
यावेळी अनेक तरुणासह वयोवृद्धांनी त्यांची भेट घेत हे महानाट्य पाहिल्यानंतर आपण साकारलेल्या छत्रपतींच्या भूमिकेतून संभाजींचे कर्तृत्व, धर्मनिष्ठा काय होती हे साक्षात अनुभवता आले. आम्हाला खरा इतिहास जाणून घेता आला, भूमिका साकारताना छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास सांगण्यासाठीची आपली तळमळ वाखाणण्याजोगी आहे. त्या काळात छत्रपती संभाजी राजे यांची ताकद काय असेल हे आपल्या नाटकाने आम्हाला दाखवून दिले हा इतिहास सर्वत्र महानाट्यातून पोहोचावा आणि त्यासाठी प्रत्येकानेच यात सहभाग नोंदवावा अशा प्रतिक्रिया ज्येष्ठांनी व्यक्त केल्या. यावेळी रेमंड शोरूम चे बाळू शेठ जाजू, अमर जाजू, निलेश जाजू , जगदीश जाजू , राजेश जाजू , योगेश त्रिवेदी, महेंद्र वझे, जयप्रकाश जातेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, कालिदास कला मंदीर येथे कवी राजेंद्र सोमवंशी यांनी गीत नवे गाऊ हे पुस्तक भेट दिले. शेतकरी व्यथेवर आधारित कविता कोल्हे यांनी म्हटली. यावेळी ३आणि ४ वर्षीय बालकाने छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांचे डायलॉग सादर केले.
तिसऱ्या दिवशीही मिळाला प्रतिसाद
तिसऱ्या दिवशीही संभाजी महाराज यांच्या शो ला प्रतिसाद मिळाला. सोमवारी ( दी २३) शस्र पुजा व आरती चा मान दिनकर पाटिल अमोल पाटिल व सौ,लता पाटिल सचिन उषा विलास जोशी यांना मिळाला.
अभिनेता कोल्हे यांच्याकडून आर्थिक मदत
अभिनेते खा.अमोल कोल्हे यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवराना आर्थिक मदत केली. उत्कृष्ट वैद्यकिय सेवा देणाऱ्या श्री गुरुजी रुग्णालयासाठी विनायक गोविलकर यांना १ लाख रूपये, आनंद ठाकूर यांना ११ हजार, खाद्यबरोबरच वाचनसंस्कृती अखंडित पणे जोपासणाऱ्या भीमा ताई जोंधळे यांचा सत्कार करण्यात आला.