सावानाच्या कार्याध्यक्ष पदी गिरीश नातू प्रमुख सचिव पदी डॉ.धर्माजी बोडके यांची निवड
सहाय्यक सचिव पदी ॲड अभिजीत बगदे ,अर्थसचिव पदी देवदत्त जोशी
नाशिक-सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या कार्याध्यक्ष पदी गिरीश नातू, प्रमुख सचिव पदी डॉ.धर्माजी बोडके, सहाय्यक सचिव पदी ॲड अभिजीत बगदे ,अर्थसचिव पदी देवदत्त जोशी यांची निवड करण्यात आली.
सावानाच्या नूतन कार्यकारी मंडळाची पहिली सभा काल वस्तुसंग्रहालयात सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेस उपाध्यक्ष डॉ.सुनिल कुटे, वैद्य विक्रांत जाधव उपस्थित होते.
या सभेपूर्वी सन २०१७-२०२२ व सन २०२२ -२०२७ या दोन्ही कार्यकारी मंडळाची एकत्रित सभा अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस माजी उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते व कार्यकारी मंडळ सदस्य बी.जी.वाघ उपस्थित होते. यावेळी नूतन कार्यकारी मंडळास नानासाहेब बोरस्ते व बी.जी.वाघ यांनी शुभेच्छा देतांना आगामी काळात सावानाच्या सर्वतोपरी हितासाठी आपण सदैव नूतन कार्यकारी मंडळासोबत असू अशी ग्वाही देतांनाच तंटामुक्त सावानासाठी अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्याबरोबर कायम आहोत असे सांगितले.
या सभेनंतर नवीन पदाधिकारी निवडीच्या सभेस सुरुवात झाली, कार्याध्यक्ष पदी गिरीश नातू, प्रमुख सचिव डॉ.धर्माजी बोडके, सहाय्यक सचिव पदी ॲड अभिजीत बगदे ,अर्थसचिव पदी देवदत्त जोशी ग्रंथसचिव पदी जयप्रकाश जातेगावकर, सांस्कृतिक कार्य सचिव पदी संजय करंजकर, नाट्यगृह सचिव पदी सुरेश गायधनी, व वस्तुसंग्रहालय पदी सौ. प्रेरणा बेळे यांची निवड करण्यात आली.
यासभेस उपाध्यक्ष डॉ.सुनिल कुटे, वैद्य. विक्रांत जाधव, नूतन कार्यकारी मंडळ सदस्य उदयकुमार मुंगी, जयेश (गणेश) बर्वे, मंगेश मालपाठक, प्रा. सोमनाथ मुठाळ, प्रशांत जुन्नरे,ॲड.भानुदास शौचे उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांना कार्यकारी मंडळ सदस्य तसेच सावाना सेवकवृंदाने शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.