नाशिक लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून डॉ.शेफाली भुजबळ ?

0

नाशिक,दि,२७ एप्रिल २०२४ –नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही.दिल्ली वरून छगन भुजबळ यांच्या नावाला पसंती होती परंतु छगन भुजबळ यांनी माघार घेतली. त्यात कालच छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज नेल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला त्यात आज पुन्हा एकदा नवीन चर्चेला उधाण आले असून नाशिक लोकसभा मतदार संघातून छगन भुजबळ यांच्या स्नुषा  शिक्षण क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या  डॉ.शेफाली भुजबळ यांना महायुती कडून उमेदवारी द्यावी अशी चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे. डॉ. शेफाली भुजबळ यांच्या नावाला नाशिक सह दिल्लीतून  पसंती असल्याचे समजते आहे.

नाशिक मतदार संघावर शिवसेना शिंदे गटाने आपला दावा कायम ठेवल्याने युतीमध्ये धुसफूस सुरु असल्याचे चित्र आजही कायम आहे .२० मे रोजी नाशिक लोकसभेचे मतदान होणार असुन ३ मे रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करायचा शेवटचा दिवस आहे.शिवसेना शिंदे गटाचे  हेमंत गोडसे अद्याप वेटिंग वर आहेत त्यात तरी राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक लोकसभा मतदार संघावर आपला दावा कायम ठेवला आहे.त्यात उच्चशिक्षित असणाऱ्या डॉ.शेफाली भुजबळ यांचे नाव पुढे आल्याने नाशिक लोकसभा मतदार संघ आता चर्चेत राहणार आहे,

या बाबत डॉ.शेफाली भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता या फक्त चर्चा आहे या बाबत आपल्याला अद्याप कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.