नाशिक – डॉ.शेफाली भुजबळ यांनी रेखाटलेल्या विविध निसर्ग चित्रांचे नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन ग्रँड्युर हॉल येथे चार दिवसीय ‘निसर्गायण’ हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाचे उद्दघाटन दि.११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. सदरचे चित्रप्रदर्शन दि.१२ ते १५ मार्च २०२२ या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.
नुकतेच मुंबई येथे डॉ.शेफाली भुजबळ यांचे ‘अनावरणम्’ हे चित्रप्रदर्शन पार पडले असून या प्रदर्शनास उत्तम असा प्रतिसाद लाभला. त्यानंतर आता प्रथमच नाशिक शहरात त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. डॉ.शेफाली भुजबळ यांनी अनेक वर्षांपासून चित्रकलेचा छंद जोपासला असून त्यांचा चित्रकला क्षेत्रात अभ्यासही आहे. त्याची सुंदर प्रचिती म्हणजेच ‘निसर्गायण’. मॅनेजमेंट विषयात डॉक्टरेट केलेल्या डॉ.शेफाली भुजबळ यांनी भरतनाट्यम क्षेत्रातही विशेष प्राविण्य मिळविले असून कला क्षेत्राची त्यांनी विशेष आवड जोपासली आहे.