युद्धविरामाच्या अवघ्या ४ तासांत पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार आणि ड्रोन हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये तणाव वाढला:युद्धविराम की आक्रमणाची तयारी ?(गोळीबार आणि ड्रोन हल्ल्याचा व्हिडीओ पहा)

1

जम्मू, दि. १० मे २०२५ – Drone Attack in Jammu & Baramulla भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर युद्धविराम जाहीर झाला असला तरी, पाकिस्तानने केवळ ४ तासांतच त्या युद्धविरामाचा भंग केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांमुळे वातावरण चिघळले आहे.

शनिवारी संध्याकाळी ५ वाजता युद्धविराम लागू झाला, पण त्यानंतर रात्री अखनूर, राजौरी, आरएस पुरा आणि पालनवाला सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून तोफ गोळ्यांचा मारा करण्यात आला. त्याचवेळी बारामुल्ला जिल्ह्यात एक संशयित ड्रोन आढळून आला, ज्यामुळे मोठा स्फोट झाला.

महत्त्वाचे अपडेट्स:(Drone Attack in Jammu & Baramulla)

राजौरी, बारामुल्ला, आणि श्रीनगरमध्ये जोरदार गोळीबार

जम्मूमध्ये ब्लॅकआउट; सुरक्षाव्यवस्था अधिक कडक

राजस्थानमधील पोखरणमध्येही ड्रोन हल्ल्याचे वृत्त

भारताकडून कडक प्रत्युत्तराचे आदेश

स्फोटांचे आवाज श्रीनगर शहरातही ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले असून, भारतीय लष्कर सतर्क आहे. गृहमंत्रालयाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला सशक्त प्रत्युत्तर द्यावे.

पार्श्वभूमी:

आज दुपारी ३:१५ वाजता पाकिस्तानच्या DGMO ने भारताच्या DGMO ला फोन करून युद्धविरामाची मागणी केली होती

संध्याकाळी ५ वाजता अधिकृत घोषणा झाली

त्यानंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने उल्लंघन केले

🕊️ युद्धविराम की आक्रमणाची तयारी?
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] जाहीर करण्यात आला असला तरी पाकिस्तानकडून सिजफायरचे उल्लंघन थांबताना दिसत […]

Don`t copy text!