मुसळगावच्या केमिकल कंपन्यांमुळे १४२ एकर जमिनी नापीक ?:पिण्याचे पाणी ही झाले दूषित
शेतकरी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात
नाशिक-केमिकल मिश्रित दूषित पाण्यामुळे मुसळगाव शिवारातील १४२ एकर शेतजमीन नापीक झाल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर माणसांसह जनावरांनाही येथील पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक वर्षांपासून टैंकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. परिसरातील ५७ हेक्टर शेतजमिन नापिक झाली असून ७०-८० विहीरीचे पाणी हे दूषीत झाले आहे.या भागातील शेतकऱ्यांना तातडीने न्याय न मिळाल्यास सोमवार पासून येथील शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा परिवर्तन कामगार सेनेचे विशाल भादर्गे यांनी दिला आहे.
या विषया संदर्भात परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष विशाल भदर्गे यांच्या नेतृत्वाखाली सर्व बांधीत शेतकरी गेल्या २ वर्षांपासून लढा दत आहेत.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालया समोर दि. ३ सप्टेंबर पासून सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील सर्व शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. केमिकल मिश्रित दूषित पाण्यामुळे मुसळगाव शिवारातील १४२ एकर शेतजमीन नापीक झाल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर माणसांसह जनावरांनाही येथील पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक वर्षांपासून टैंकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
गेल्या ३० वर्षांपासून सिन्नर मुसळगांव एम.आय.डी.सी.तील ४०-५० कंपन्याकडून सातत्याने केमिकल मिश्रीत सांडपाणी सर्रासपणे उघड्यावर सोडले जात आहे. परिणाम मुसळगांव परिसरातील ५७ हेक्टर शेतजमिन नापिक झाली असून ७०-८० विहीरीचे पाणी हे दूषीत झाले आहे.तसेच टायर जाळल्यामुळे त्याचे धूर हे थोरेफार पिकत असलेल्या शेतजमिनीवर साचून ते पिक ही खराब होत आहे.
हतबल शेतकऱ्यांचे प्रदुषण नियंत्रण मंडळ कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण
मुसळगांव एमआयडीसीतील केमिकल मिश्रित कंपन्यांच्या पाण्यामुळे नापीक झालेल्या शेतजमिनींची नुकसान भरपाई मिळावी. या केमिकल मिश्रीत कंपन्यामुळे नैसर्गिक पिण्याचे पाण्याचे स्रोत असलेल्या विहीरींचे पाणी खराब झाले आहे. नागरीकांना तसेच जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्यात मावी. केमिकल मिश्रीत कंपन्यामुळे ज्या शेतजमिनी नापीक आल्या आहेत, त्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरुपी कंपनीत नोकरी देण्यात यावी. या प्रकरणात तत्कालिन एम. आर. ओ अमर दुर्गुळे यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मुसळगाव येथील प्रमोद मुसळे, सदाशिव झाडे, सोपान डावरे, बाळासाहेब सिरसाट, दिपक सिरसाट, शंकर वाध, पंढरिनाथ शिंदे, उध्दव सिरसाट, संतोष सिरसाट, किशोर शिंदे, खंदु शिंदे, रजिंद्र शिंदे, माधव शिंदे, रंगनाथ जाधव आदि असंख्य शेतकरी या उपोषण आंदोलनास बसले आहेत.सदर उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक यांच्या विरोधात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार केलेला आहे.
या सर्व प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी हे दोषी उद्योजक वरिष्ठ पातळीवर दबाव आणून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची शकत्या असून , परिवर्तन कामगार सेनेचे विशाल भादर्गे यांनी माननीय अविनाश ढाकणे सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा यांना शेतकऱ्यांची बाजू न ऐकता कोणताही निर्णय घेऊ नये असे आवाहन केले असून तसे निवेदन त्यांना दिले आहे