नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रेल्वे अपघातामुळे ‘या’गाड्यांच्या मार्गात बदल :तर काही गाड्या रद्द 

अपघातात ४ जणांचा मृत्यू ,७० हुन अधिक जण जखमी:मृतांच्या नातेवाईकांना १० लाखाची मदत 

0

चांदौली,दि. १२ ऑक्टोबर २०२३ –दानापूर रेल्वे विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस ट्रेनला कल रात्री अपघात झाला. त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. अशी माहिती रेल्वे विभागाने जारी केली आहे. यूपीकडे जाणाऱ्या गाड्या आरा सासाराम डीडीयू मार्गे नेल्या जातील. तर डाऊनकडे जाणाऱ्या गाड्या DDU वरून सासाराम गया मार्गे पुढे जातील.

बिहारमधील बक्सरजवळील आनंद विहार टर्मिनलवरून उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमार्गे कामाख्या (आसाम) जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट सुपरफास्ट एक्स्प्रेसला बुधवारी रात्री अपघात झाला. या ट्रेनच्या 21 बोगी रुळावरून घसरल्या आहेत. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. दानापूर रेल्वे विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ हा अपघात झाला. आता रेल्वे विभागाने अप आणि डाऊन गाड्यांच्या मार्गात बदल केले आहेत. तसेच काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

डाऊन गाड्यांच्या मार्गात बदल
गाडी क्रमांक १२१४९ पुणे-दानापूर एक्सप्रेस डीडीयू सासाराम आरा मार्गे जाईल. यासोबतच १२१४१ एलटीटी पाटलीपुत्र एक्सप्रेस, १२४२४ राजधानी एक्सप्रेस डीडीयू सासाराम आरा मार्गे जातील.

अप जाणाऱ्या गाड्यांचे मार्ग बदलले
ट्रेन क्रमांक 19484 अहमदाबाद एक्सप्रेस आरा सासाराम DDU मार्गे जाईल. यासोबतच १२४२३ नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस, २२४४९ नवी दिल्ली ईशान्य संपर्क क्रांती एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक १२१५० दानापूर पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस, १३२०१ मुंबई एलटीटी जनता एक्सप्रेस, १५४८३ सिक्कीम महानंदा एक्सप्रेस, २२९७२ वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट डी सासाराम एक्स्प्रेस जातील. या व्यतिरिक्त १२३६८ विक्रमशिला एक्सप्रेस डीडीयू गया पाटणा मार्गे जाईल. 15623 BGKT कामाख्या एक्सप्रेस, 15633 गुवाहाटी एक्सप्रेस, 12310 NDLS-RJPB तेजस राजधानी एक्सप्रेस, 22406 आनंद विहार भागलपूर एक्सप्रेस,१२४८८ सीमांचल एक्सप्रेस, १५४८४ सिक्कीम महानंदा एक्सप्रेस, २२४६६ बाबा बैद्यनाथ धाम सुपरफास्ट एक्सप्रेस डीडीयू पाटणा गया मार्गे जाईल.

रद्द केलेल्या गाड्या
ट्रेन क्रमांक १५१२५ काशी पटना जनशताब्दी एक्सप्रेस आणि १५१२६ पटना काशी जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!