दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार १०० ‘ई-शिवाई’

0

किरण घायदार
नाशिक,दि, १७ ऑक्टोबर २०२४ – राज्य परिवहन (एसटी) महामंडळ सध्या वाहन खरेदीवर भर देत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात १२ मीटर लांबीच्या आणखी १०० ई-शिवाई गाड्या लवकरच दाखल होणार आहेत.सध्या मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत नव्या गाड्यांची आसनक्षमता अधिक आहे. त्यामुळे सणासुदीत प्रवाशांना आणखी बस मिळणार आहेत.

एसटीने ५,१५० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १३८ मिडी ई-बसेस यापूर्वी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई- शिवनेरीच्या ताफ्यात मागच्या आठवड्यात १७ नव्या बस दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत या मार्गावर ८३ गाड्या होत्या. नवीन बसगाड्यांच्या समावेशामुळे ई- शिवनेरीची संख्या आता १०० वर पोहोचली आहे. त्यामुळे दिवाळीत मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

या १२ मीटरच्या बसची आसनक्षमता ४५ प्रवाशांची आहे. सध्याच्या नऊ मीटरच्या बसची आसनक्षमता ३२ आहे. सध्या राज्यात १३६ ई-मिडीबस (नऊ मीटर लांबीच्या) धावत आहेत. ठाणे, नाशिक, सातारा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड अशा विभागांत धावणाऱ्या बसगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

नागपूर-चंद्रपूर या मार्गावर,त्यानंतर नाशिक-बोरीवली तसेच नाशिक- छत्रपती संभाजीनगर या मार्गावर या बसेस सुरू केल्या जाणार आहेत. या गाड्यांचे तिकीट दर सध्या चलनात असलेल्या ई-शिवाई बसेस प्रमाणेच ठेवण्यात येणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.