मराठवाडा भूकंपाने हादरला : नांदेड हिंगोली मध्ये अनेक घरांना तडे गेले
भूकंप मापकावर तब्बल ४.२ रिश्टर स्केल एवढी नोंद
नांदेड,दि,२१ मार्च २०२४ –आज २१ मार्चची सकाळ मराठवाड्यातील नागरिकांसाठी भीतीदायक ठरली.नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी ६.९ मिनिटांपासून ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत म्हणजेच ११ मिनिटं हे धक्के जाणवले. याची नोंद भूकंप मापकावर तब्बल ४.२ रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली.या मुळे काही घरांना तडे गेले आहेत.मराठवाड्यातील १९९३ च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे साखरझोपेत असणाऱ्या नागरिकांनी आणि कामाला जाण्याची तयारी करणाऱ्या नोकरदारांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली.मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाच पहिला धक्का बसला. रिश्टल स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ एवढी मापण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा आणि दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागामध्ये जमिनीच्या आत १० किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे दिसून आले.पहिल्या धक्क्यातून नागरिक सावरत नाही तोच बरोबर ११ मिनिटांनी अर्थात सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी भूकंपाचा दुसरा धक्का बसला. भूकंप मापक यंत्रावर याची नोंद ३.६ रिश्टल स्केल एवढी झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू तीन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. या भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे.तब्बल ११ मिनिटे धरणीकंप झाला. यामुळे अनेक घरांना तडे देखील गेले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या घटनेत कोणत्याही प्रकारच्या आर्थिक तसेच जीवित हानी झाली नसल्याची माहिती दिली.भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून १५ किलोमीटरवर अंतरावर होता