राजधानी दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला : भूकंपाची तीव्रता ६.६ रिश्टर स्केल
भूकंपाचा महाराष्ट्राला किती धोका ?
नवी दिल्ली,दि २२ मार्च २०२३ – राजधानी दिल्लीसह उत्तर भारत भूकंपा तीव्र धक्के जाणवले शिवाय जम्मू काश्मीर ,हिमाचल, राजस्थानच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारताशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, ताजिकिस्तान आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान असल्याचे सांगण्यात येत आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.७ इतकी आहे.
रात्री १० ते १०.१५ च्या दरम्यान दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दोनदा हे धक्के जाणवले. उत्तर प्रदेश, पंजाब-उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही हे धक्के जाणवले आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी मोजली गेली आहे. अफगाणिस्तानमधील फैजाबाद हे भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये बराच वेळ भूकंपाचे धक्के जाणवले. लोक घाबरून घराबाहेर पडले. हे धक्के १० सेकंदांसाठी जाणवले तर काही लोकांचे म्हणणे आहे की हे धक्के एक ते दीड मिनिटांसाठी जाणवले.
दिल्लीच्या शकरपूर भागातील एक इमारत भूकंपाच्या धक्क्याने झुकली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली अग्निशमन सेवेचे म्हणणे आहे की, त्यांना शकरपूर परिसरात एका इमारतीला झुकल्याची माहिती मिळाली आहे. श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपामुळे घरांमध्येही तडे गेले आहेत. पाकिस्तान, कझाकिस्तान मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. घरातील झुंबर, पंखे, वस्तू हलू लागल्या आणि लोक मोठ्या संख्येने घरातून बाहेर आले.
यापूर्वी ५ जानेवारी रोजी उत्तर भारतासह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तान आणि आसपासच्या भागातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. इस्लामाबाद, लाहोर आणि आसपासच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले.
उत्तर भारतातला या वर्षातला हा तिसरा भूकंप
दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतातला या वर्षातला हा तिसरा भूकंप आहे. पण २१ मार्चच्या या भूकंपाची तीव्रता जास्त होती, कारण हा भूकंप ९ ते १० सेकंद जाणवला.हिमालयीन प्रदेशात मोठा भूकंप होण्याचा धोका आहे, ज्यामुळे मोठ्या क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा आधीच वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीच्या शास्त्रज्ञांनी इशारा दिला होता. तसंच आयआयटी कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांनीही भविष्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
भूकंपाचा महाराष्ट्राला किती धोका ?
भारतीय प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील टक्कर पृथ्वीखाली वाढत आहे, असं या प्राध्यापकांनी सांगितलं होतं. ईशान्येकडील सर्व राज्ये, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील काही भाग फक्त झोन-5 अंतर्गत येतात. उत्तराखंडच्या कमी उंचीच्या भागांपासून ते उत्तर प्रदेश आणि दिल्लीचा बहुतांश भाग झोन-4 अंतर्गत येतो. मध्य भारतासह महाराष्ट्र तुलनेने कमी धोक्याच्या झोन-3 मध्ये येतो, तर दक्षिणेकडील बहुतांश भाग मर्यादित धोक्यासह झोन-2 मध्ये येतात.