दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला : नेपाळ मध्ये ६ जणांचा मृत्यू 

भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल : सर्वाधिक फटका नेपाळमध्ये बसण्याची भीती 

0

नवी दिल्ली,९ नोव्हेंबर २०२२-दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला आहे. मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल नोंदवली गेली आहे.भूकंपाच्या धक्क्याने नेपाळमध्ये दोती जिल्ह्यात एक घर कोसळले असून या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून या भूकंपाचा सर्वाधिक फटका नेपाळमध्ये बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रात्री उशिरा आलेल्या या भूकंपानंतर लोक घाबरुन घराबाहेर आले आणि उभे राहिले. भूकंपानंतर धक्का जोरदार बसल्यामुळे लोकही चिंतेत होते. लखनऊ आणि दिल्लीला सुमारे ५.७ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले. रात्री झोपलेल्या लोकांचे पलंग आणि छताचे पंखे अचानक हलू लागले. त्यानंतर भीतीचे वातावरण पसरले. लोक फोनवरुन एकमेकांची काळजी विचारीत होते.

नेपाळ, भारताशिवाय चीनमध्येही भूकंपाचे धक्के लोकांना जाणवले. नेपाळ आणि मणिपूरमध्ये दुपारी १.५७ वाजताच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले.गेल्या २४ तासांत भूकंपाचे तीन धक्के बसले आहेत. पहिला रात्री ८.५२ वाजता आला, ज्याची तीव्रता ४.९  रिश्टर स्केल इतकी होती. दुसरा ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप रात्री ९.४१ वाजता झाला. यानंतर रात्री उशिरा २ वाजता तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के बसले.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची खोली जमिनीखाली १० किमी होती.नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील पिथौरागडपासून ९० किमी. अंतरावर दक्षिण पूर्वमध्ये भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जात आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.