ED ची वसईत मोठी कारवाई! माजी नगरसेवक अडचणीत

विदर्भातही आयकर विभागाची मोठी धडक!

1

वसई, महाराष्ट्र |१४ मे २०२५ | – ED Raid News महाराष्ट्रात मनी लाँड्रिंग प्रकरणावरून खळबळजनक कारवाई करण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने वसई-विरारमध्ये एकाचवेळी १३ ठिकाणी छापेमारी केली. या धाडसत्रामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

🏗️ 41 बेकायदेशीर इमारतींचा प्रचंड घोटाळा (ED Raid News)
२००६ मध्ये सीताराम गुप्ताने वसईतील वसंत नगरी आणि अग्रवाल परिसरातील सर्वे क्र. २२ ते ३० मधील शासकीय आणि खासगी जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम सुरू केले. या भूखंडांपैकी काही जागा डंपिंग ग्राउंड व एसटीपी प्लांटसाठी राखीव होत्या.

२०१० ते २०१२ या काळात तब्बल ४१ चारमजली इमारती उभारल्या गेल्या आणि अनेक सदनिका नागरिकांना विकण्यात आल्या. मात्र, कोर्टाने या इमारती बेकायदेशीर ठरवल्या, आणि वसई-विरार महापालिकेने त्या पाडल्या. या कारवाईमुळे सुमारे २५०० नागरिक बेघर झाले आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाली.

🔍 ईडीचे धाडसत्र सुरु
या प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कारवाईचा मोठा बडगा उगारला असून सीताराम गुप्तावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. तपासासाठी १३ ठिकाणी एकाच वेळी ईडीच्या टीमने छापे टाकले.

💰 विदर्भातही आयकर विभागाची मोठी धडक!
दरम्यान, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि परतवाडा येथे आयकर विभागाने सोन्या-चांदीच्या दुकानांवर छापे टाकले आहेत. पूनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स आणि एकता ज्वेलर्स यांच्यावर सकाळपासून कारवाई सुरु आहे. या धाडसत्रामुळे सराफा बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत वसई-विरार […]

Don`t copy text!