परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासह ७ ठिकाणी ईडीचे छापे 

0

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापे टाकल्यानं एकच खळबळ उडालीआहे.गुरुवारी (२६मे )सकाळीच ईडीकडून छापेमारी करण्यात आली. महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याच्या घरावर ईडीनं पहाटेपासून छापेमारीला सुरुवात केल्यानं महाराष्ट्राचं राजकारण  पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे.

अनिल देशमुक आणि नवाब मलिकांनंतर आता मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आलेत. गुरुवारी (२६ मे, २०२२) अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आलं आहे  यांच्याविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली  ईडीकडून अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये अनिल परब यांच्या घराचाही समावेश आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच अनिल परब यांच्यावर सुमारे ५० कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं आहे. त्यासोबतच वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी आणि दापोलीतही ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली असल्याचं वृत्त समोर येत आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, अनिल परब यांच्या पुण्यातील मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यां यांनी काही दिवसापूर्वीकेला होता. या रिसॉर्ट प्रकरणात किरीट सोमय्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. याच अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणात परब यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला. काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांच्याशी संबंधित काही व्यक्तींवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.