नवाब मलिक यांची ईडी कडून चौकशी सुरु

0

मुंबई –राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ,महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात घेऊन गेले असून सकाळी ७.४५ वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयाच चौकशी सुरु आहेत. ईडीचे अधिकारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांच्या घरावर पोहोचले. ईडीनं सकाळ सकाळी केलेल्या कारवाईमुळे चर्चांना उधाण आलं आहे.एका मालमत्तेच्या गैरव्यवहारावरुन ही कारवाई ईडीकडूनन करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. सकाळी ७.४५ वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयाच चौकशी सुरु आहेत.

आज पहाटे नवाब मलिक यांच्या कुर्ला या निवासस्थानी ईडीचे अधिकारी ४.३० ते ५ वाजताच्या दरम्यान पोहचले. त्यानंतर नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात स्वत: हून येण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक हे ईडी अधिकाऱ्यांसोबत घरातून निघाले.

गेल्या दोन ते अडीच तासापासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी यांचे समर्थक जमण्यास सुरुवात झाली असून त्या ठिकाणी ही पोलिसबंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.