महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस  

नव्या सरकारला २ जुलैला बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

0

मुंबई – मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की..!असा एकच आवाज दुमदुमला आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे तीसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

आज राजभवनमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. गोव्याहून आल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता.त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा करून आपला मास्टरस्ट्रोक मारला.

नव्या सरकारला २ जुलैला बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता शिवसेनेच्या शिंदे गटाचं आणि भाजपचं सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज्यपालांनी या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करा, असे आदेश दिले आहेत.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी येत्या शनिवारी म्हणजेच २ जुलैला विशेष अधिवेशने भरवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या शनिवारी विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात विधासभा अध्यक्षांचीदेखील निवड होणार असल्याची माहिती सूत्रांना दिली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!