एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
देवेंद्र फडवणीस यांचा "मास्टरस्ट्रोक"
मुंबई – महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा भाजपाचे नेते देवेंद्र फडवणीस यांनी आज पत्रकार परिषदेत केले. आज सायंकाळी ७:३० वाजता राजभवनात फक्त एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मी स्वतः सरकार बाहेर राहणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
काल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा सर्वांचा अंदाज होता. पण आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषदत घेतली. त्यात स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. आज संध्याकाळी त्यांचा एकट्याचाच शपथविधी होईल अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलीय
फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं: एकनाथ शिंदे
भाजपा कडे संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “या संबंधी भाजपने आम्हाला साथ दिली, संख्याबळानुसार त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा न लावता बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिलं. हा देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस आमच्या पाठिशी आहे. ते मंत्रिमंडळात नसले तरी ते राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.असं हि शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले