पक्ष हितासाठी काही खासदारांना थांबायला लावले : एकनाथ शिंदेंचे सूचक वक्तव्य
खासदारांचा योग्यतो सन्मान मी ठेवणार ,त्यांना चांगली संधी मिळणार
मुंबई,दि ,२४ एप्रिल २०२४- महायुतीमध्ये काहीच वाद नाही,काही ठिकाणी तडजोड करावी लागते.पक्षहितासाठी काही गोष्टी कराव्या लागतात.त्यामुळे काही खासदार दोनदोन पाच पाच वेळा निवडून आलेल्या काही खासदारांना थांबायला सांगितले हा पक्षाचा निर्णय आहे.त्यांना थांबायला लावले असले तरी मी त्यांच्या पाठीशी संकट काळात उभा राहणारा आहे.हात वर करणारा मी नाहीये.त्यामुळे त्यांना माहिती आहे मी त्यांना वाऱ्यावर सोडणारा नाही त्यांचा योग्यतो सन्मान मी ठेवणार असून त्यांना चांगली संधी मिळणार असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.भावना गवळी आणि हेमंत गोडसे यांच्या विषयी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले मी भाजपचं ऐकतो,ही गोष्ट पूर्णपणे चूक आहे,ही कुजबुज फक्त मिडिया करतो आहे.असे ही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले.यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची मुक्तकंठाने तारीफ केली. तसेच आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला त्यांचा वाटा मिळू शकतो,असे संकेतही दिले.काँग्रेस पक्षाने देशाला ५०-६० वर्षात खड्ड्यात घातले.पण मोदीजी देशाचा विकास करत आहेत. त्यामुळेच राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला.त्यांनी घरी बसणाऱ्यांना आणि फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना किंवा शिव्याशाप देणाऱ्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता का? राज ठाकरे यांनी मोदींना आणि महायुतीला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे,असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देताना कोणतीही अट घातलेली नाही.आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला काय द्यायचं,याचा विचार नक्कीच होऊ शकतो,परंतु आता याबाबत काहीच ठरलेले नाही.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आम्ही लवकरच एकत्र दिसू.याशिवाय,राज ठाकरे स्वतंत्रपणे सभा घेतील,असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.