शिंदे गटाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

0

नवी दिल्ली ११,ऑक्टोबर २०२२ – शिंदे गटाला निवडणुक चिन्ह देण्याबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय जाहीर केला आहे.  एकनाथ शिंदे गट ढाल-तलवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.काल ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नवे तीन पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन पर्या देण्यात आले होते. त्यातून त्यांना ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलंय.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे चिन्हाचा वाद तात्पुरता मिटला आहे.निडणूक आयोगाने काल दोन्ही गटांना पक्षाची नावं दिली. यात ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलंय. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव दिलं होतं. शिवाय ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाला दुसऱ्या तीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले होते.  त्यानंतर शिंदे गटाकडून आज ढाल-तलवार, उगवता सूर्य आणि पिंपळाचं झाड अशी तीन चिन्हं देण्यात आली होती. त्यातील ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे.

निवडणूक आयोगाने हा निर्णय फक्त अंधेरी पोट निवडणुकीसाठी दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपला ठाकरे गटाविरोधात आपला उमेदवार उतरवरणार काय हे येत्या काळात समजेल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!