पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार :आयोगाची आज पत्रकार परिषद

0

नवी दिल्ली.दि ९ ऑक्टोबर २०२३ – निवडणूक आयोग आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यामध्ये पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात. या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर यावेळीही राजस्थान, मिझोराम, तेलंगणा आणि मध्य प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात आणि नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होऊ शकते. मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ १७ डिसेंबर रोजी संपत आहे, तर राजस्थान विधानसभेचा कार्यकाळ १४ जानेवारी, मध्य प्रदेश ६ जानेवारी, तेलंगणा १६ जानेवारी आणि छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ ३ जानेवारी रोजी संपत आहे.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात
सूत्रांवर विश्वास ठेवला तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होऊ शकते आणि १५ डिसेंबरपूर्वी निकाल जाहीर होऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या पोलिस, सामान्य आणि खर्च निरीक्षकांसोबत दिवसभर चाललेल्या या बैठकीचा उद्देश आदर्श आचारसंहिता प्रभावीपणे राबविली जावी आणि पैशाचा आणि मसल पॉवरचा निवडणुकांवर कोणत्याही प्रकारे प्रभाव पडू नये यासाठी रणनीती सुसूत्रीकरण करणे हे होते.याशिवाय, निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वसमावेशक निवडणुका पार पाडण्यासाठी सुनियोजित व्यवस्था करणे आवश्यक आहे.असे बैठकीचे स्वरूप होते

पाचपैकी दोन राज्यात काँग्रेसची सत्ता
सध्या पाच राज्यांपैकी राजस्थान आणि छत्तीसगड दोन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. लोकसभेच्या निवडणुकापूर्वी  या राज्यातून काँग्रेसला किती मतदान होणार याची चाचणी या निवडणुकांमध्ये होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशची निवडणूक देखील चर्चेत आहे. कारण भाजपने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच केंद्रातील बड्या नेत्यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे.

शिवराजसिंह चौहान यांचे तिकिट अद्याप जाहीर झालेले नाही त्यामुळे त्यांच्याबाबत काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. शिवराजसिंह चौहान हे भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार का हे भाजपने जाहीर केलेले नाही.भाजपला ही राज्यं आपल्याकडे ठेवण्यात यश येतं का याचं उत्तर देणारी ही निवडणूक असेल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.