मुंबई, २१ जुलै २०२५ – Electric Scooter भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या झेलीओ ई-मोबिलिटीने आज त्यांच्या लोकप्रिय ग्रेसी+ इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्टेड मॉडेल अधिकृतपणे बाजारात सादर केले. केवळ ₹५४,०००/- (एक्स-शोरूम) या प्रारंभिक किमतीत उपलब्ध असलेली ही स्कूटर आता तब्बल ६ बॅटरी पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
नवीन ग्रेसी+ स्कूटर विद्यार्थ्यांपासून गिग वर्कर्सपर्यंत सर्वांसाठी डिझाइन करण्यात आली असून, ती शहरातील रोजच्या प्रवासासाठी आदर्श पर्याय ठरते. यामध्ये लिथियम-आयन बॅटरीचे दोन पर्याय – ६०व्ही/३०एएच (₹६५,०००/-; रेंज: ११० किमी) आणि ७४व्ही/३२एएच (₹६९,५००/-; रेंज: १३० किमी) तसेच जेल बॅटरीचे चार पर्याय – ६०व्ही/३२एएच (₹५४,०००/-; रेंज: ८० किमी), ६०व्ही/४२एएच (₹५८,०००/-; रेंज: १०० किमी), ७२व्ही/३२एएच (₹५६,५००/-; रेंज: १०० किमी), ७२व्ही/४२एएच (₹६१,०००/-; रेंज: १३० किमी) देण्यात आले आहेत.
ही लो-स्पीड स्कूटर २५ किमी/तास टॉप स्पीड देते आणि १.८ युनिट वीज वापरून एका चार्जमध्ये १३० किमी पर्यंत रेंज देते. ६०/७२व्ही बीएलडीसी मोटरने चालणारी ही स्कूटर ८८ किग्रॅ वजनाची असून १५० किग्रॅ पर्यंत पेलोड घेऊ शकते. लिथियम बॅटरीचे चार्जिंग वेळ सुमारे ४ तास, तर जेल बॅटरीचे वेळ ८-१२ तास आहे.
ग्रेसी+ मध्ये सुरक्षा आणि आराम यावर विशेष भर देण्यात आला आहे. समोरील ड्रम आणि मागील डिस्क ब्रेक्स, हायड्रॉलिक शॉक ॲब्झॉर्बर्स, १८० मिमी ग्राउंड क्लिअरन्स, आणि शहरातील रस्त्यांसाठी योग्य असे टायर यामुळे राईड अधिक स्थिर व सुरक्षित होते.
डिजिटल डिस्प्ले, कीलेस ड्राइव्ह, अँटी-थेफ्ट अलार्म, पार्किंग गियर, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि डे-टाईम रनिंग लाइट्ससारखी आधुनिक वैशिष्ट्ये यामध्ये समाविष्ट आहेत. ही स्कूटर पांढरा, राखाडी, काळा आणि निळा अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे.
झेलीओ ई-मोबिलिटीचे सह-संस्थापक आणि एमडी कुनाल आर्य म्हणाले, “ग्रेसी+ हे आमच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतिक आहे. सुधारित वैशिष्ट्ये, विविध बॅटरी पर्याय आणि उत्कृष्ट किंमतीमुळे ही स्कूटर भारतातली शहरी प्रवासासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.”
झेलीओ सर्व मॉडेल्ससाठी २ वर्षांची वाहन हमी, लिथियम बॅटरीसाठी ३ वर्षे आणि जेल बॅटरीसाठी १ वर्षाची हमी देते.
ही स्कूटर झेलीओच्या “स्मार्ट,(Electric Scooter) टिकाऊ व परवडणाऱ्या मोबिलिटी” मिशनचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.