नाशिकला इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक क्लस्टर तसेच प्रदर्शन केंद्र मंजूर : ना.उदय सामंत  

निमाच्या पॉवर प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

0

नाशिक,दि.१९ मे २०२३ –नाशिकला इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक क्लस्टर आणि प्रदर्शन केंद्र उभारण्याची घोषणा उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांनी निमा पॉवर प्रदर्शनाचे उद्घाटनाच्यावेळी करताच उपस्थित सर्व उद्योजकांनी या घोषणेचे टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार स्वागत केले.राज्यातील शिंदे फडणवीस यांचे सरकार उद्योजकांच्या पाठीशी उभे राहणारे सरकार आहे,असेही त्यांनी पुढे नमूद केले.

त्र्यंबकरोडवरील आयटीआय मैदानावर नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (निमा)तर्फेआयोजित निमा पॉवर २०२३ प्रदर्शनाचे उद्घाटन ना.उदय सामंत यांच्या हस्ते झाले आहे त्यावेळी ते बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री नामदार दादाजी भुसे,आ.सीमा हिरे,निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे,सचिव राजेंद्र अहिरे,प्रदर्शन समितीचे चेअरमन मिलिंद रजपूत,व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचे सहसंचालक प्रफुल्ल वाकडे,एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे,प्रदर्शनाचे प्रायोजक हरीशंकर बॅनर्जी,एबीपी लिमिटेड चे प्लांट हेड गणेश कोठावदे,सिद्धार्थ शहा,विवेक गर्ग,शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी,जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते,आदी होते.

नाशिकच्या उद्योग जगताला व नाशिककर नागरिकांकरिता उद्योग मंत्र्यांकडून नीमा अध्यक्ष बेळे यांनी मागणी केलेल्या इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरचे आज गिफ्ट मिळेल असे सुतवाच पालकमंत्री नामदार दादा भुसे यांनी केले होते त्याची री ओढून उद्योगमंत्री ना उदय सामंत म्हणाले की,ना.दादा भुसे यांची दादागिरी नाहीतर आम्हाला त्यांचा भीतीयुक्त आदर वाटतो नाशिकसाठी  क्लस्टर मंजूर करून जाणार असे अभिवचन मी भाषणाच्या सुरुवातीला दिले आणि मी माझा शब्द पाळला आहे.आता जागा निश्चितीचे अधिकार पालकमंत्र्यांना दिले असून ते आणि निमा सांगतील तेथे हे क्लस्टर होईल,असेही ना.सामंत यांनी स्पष्ट केले.

तसेच निमाच्या मागणीनुसार कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्रासाठी ना.भुसे यांनी तारीख ठरवावी त्यादिवशी मी भूमिपूजनास येईल असेही आपल्या भाषणात नामदार सामंत यांनी स्पष्ट केली.दिंडोरी आणि घोटी परिसरात उद्योगासाठी होणाऱ्या नवीन जमीन अधिग्रहणाबरोबरच जुन्या अस्तित्वात असलेल्या एमआयडीसीच्या विस्तारचेही काम हाती घेतले असून तेथेही अधिग्राहणाची प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे . जाहीर केलेल्या या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या जागेत नवीन अँकर कंपन्या नक्कीच येतीलच परंतु त्याआधी नाशिकच्या आत्ता अस्तित्वात असलेल्या मोठ्या कंपन्यांनी अँकर युनिट म्हणून काम सुरू करावे, नवीन जागेवर उद्योग उभारणीचे किंवा अधिक ग्रहणाचे काम सुरू असताना होत असलेला विरोध लक्षात घेता विचारांची देवाण-घेवाण करून स्थानिक लोकांची समजूत काढण्याची जबाबदारी निमा सारख्या संघटनांनी घ्यावी,असेही ते पुढे म्हणाले

आधीच्या ठाकरे प्रणित मविआ सरकारची सामंत यांनी आपल्या भाषणात चांगलीच खिल्ली उडवली.आधीचे सरकार हे फेसबुक लाईव्ह सरकार होते.आताचे सरकार फिरणारे आणि लोकांच्या समस्या जाणून घेणारे आहे असे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली होती.आधीच्या सरकारने दावोस येथे ८० हजार कोटींचे परस्पर सामंजस्य करार(एमओयू) केले. परंतु अस्तित्वात एकही आलेला नव्हता आता नवीन शोध घेतला असता त्यापैकी  पैकी ५५ हजार कोटींचा चा असलेल्या महावितरणच्या एमओयूची अंमलबजावणी आमच्याच सरकारने केली याची आठवणही त्यांनी करून दिली.एकीकडे प्रकल्प यावेत म्हणून प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे या प्रकल्पांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तीही वाढत असल्याची खंत व्यक्त करून ना. सामंत यांनी ‘अमाथाडी’कामगार संघटनांवर जोरदार टीका केली.त्रास देणाऱ्या अशा कोणत्याही संघटना असल्यास त्वरित शासनाशी संपर्क करा.आम्ही त्याचा बंदोबस्त करू.परंतु असे करताना खऱ्यात माथाडी कामगार संघटनांवर अन्याय होणार नाही याची तुम्ही सुद्धा काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी दिला.

नोकऱ्या तर महाराष्ट्र शासन देतेच मात्र नोकरी देणारे नविन उद्योजक आम्हाला घडवायचे आहेत.महाराष्ट्र घडविण्याचे काम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत आमचे सरकार प्रामाणिकपणे करीत आहे.उद्योगवाढ़ आणि विस्तारासाठी आता राज्यात नाशिक शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे ही ना.सामंत यांनी तत्वतः मान्य केले.

आपल्या भाषणात पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची तोंडभरून स्तुती केली.जागेवर निर्णय घेणारा मंत्री मी कुठे पाहिला नाही असेही ना.भुसे यांनी सांगितले आताही ते नाशिककरांना निश्चितच गोड बातमी देतील असे ना.भुसे यांनी सांगताच त्याला उत्तर देतांना ना.सामंत यांनी लगेचच नाशिकसाठी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक क्लस्टर सहित कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्रही मंजूर करून टाकले.नाशिकसाठी चारशे खाटांचे मेडिकल कॉलेज मंजूर झाले असून लवकरच त्याची भूमिपूजन होईल.एनडीएत मुलींच्या प्रवेशासाठीचे राज्य पातळीवरील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र लवकरच नाशिकला सुरू होईल अशी घोषणाही ना.भुसे यांनी केली.

निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी आपल्या प्रस्ताविकात निमाच्या कार्याची माहिती सादर करताना उद्योजकांच्या विविध समस्या आम्ही संस्थे तर्फे उद्योग मंत्र्यापुढे नेहमीच मांडत असतो परंतु आज कुठलीही समस्या न मांडता आज नाशिककरांसाठी नाशिकच्या उद्योजकांसाठी आणि नाशिकच्या भावी पिढी करता आज मागणी करणार आहे असे सांगत नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील मोठा अनुशेष भरून काढण्यासाठी गतिमान शासन वेगवान निर्णय  या आपल्या ब्रीदवाक्य प्रमाणे शासनाने सर्वतोपरी पावले उचलावीत,उद्योग विस्तारास नाशिक हेच  एकमेव डेस्टिनेशन असल्याचे आमचा यावर्षीचा अजेंडा असून  आता येथे मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प आणण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा,नाशिकला इलेक्ट्रॉनिक-इलेक्ट्रिकल क्लस्टर आपण आज जाहीर करावे अशी गळ त्यांना घातली व उद्योगास संबंधित इतरही बाबी त्यांनी आपल्या भाषणात मांडल्या .पॉवर प्रदर्शनाचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी प्रदर्शन घेण्यामागचा उद्देश स्पष्ट करतांना या प्रदर्शनात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या उद्योजकांच्या विविध कलाविष्कारांचा समावेश असल्याचे नमूद केले.

आभार राजेंद्र अहिरे यांनी मानले.सूत्रसंचालन परी जोशी हिने केले.कार्यक्रमास निमाचे खजिनदार विरल ठक्कर,उपाध्यक्ष किशोर राठी आशिष नहार हर्षद ब्राह्मणकर, माजी अध्यक्ष विवेक गोगटे,श्री डीजी जोशी, मंगेश पाटणकर, मग्नेश कोठारी, विक्रम सारडा,नितीन वागस्कर,शशांक मणेरीकर,प्रवीण वाबळे, किरण वाजे,दिलीप वाघ, विजय जोशी, देवेंद्र विभुते, कैलास पाटील, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, कालिदास फडतरे,सुनील जाधव, संदीप भदाणे, जयंत जोगळेकर,रवींद्र झोपे, राजेंद्र वडनेरे, विराज गडकरी,हेमंत खोंड,वैभव जोशी,संजय सोनवणे,श्रीधर व्यवहारे,श्रीकांत पाटील,रवी शामदासानी,सतीश कोठारी,जयदीप राजपूत, मंगेश काठे,वेंकटेश मूर्ती,,विश्र्वास शिंपी, बाळासाहेब जाधव, किरण लोणे,वैभव चावक,विश्वास शिंपी,विजय कडवाने तसेच आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ सरचिटणीस ललित बूब,कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, हर्षद बेळे, नंदकुमार घाटे, किरण पाटील,सावानाच्या पदाधिकारी प्रेरणा बेळे निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, लघुउद्योग भारतीचे संजय महाजन, विजय वेदमुथा, राकेश पाटील, शिवाजी नरवडे, दर्शन वाळके , शैलेश नारखेडे, आकांक्षा पावर चे मधुभाई, आदीं अनेक उद्योजकांबरोबरच  विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी आणि एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार उपायुक्त कार्यालय,डी आय सी, पोलीस प्रशासन, आधी विविध शासकीय अधिकारी  व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आज प्रदर्शनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेट देणार  
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख माननीय राज साहेब ठाकरे हे आज दिनांक २० मे रोजीनिमा पॉवर या प्रदर्शनास सायंकाळी ६ वाजता भेट देण्यास येणार आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.