सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील चिमुकली लक्ष्मी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत !

मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचाच्या मंचावर समृद्धी केळकरसोबत लक्ष्मीची धमाल 

0

मुंबई,३१ जानेवारी २०२३ – स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून घराघरात पोहोचलेली लक्ष्मी म्हणजेच बालकलाकार साईशा साळवी लवकरच सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या मंचावर साईशा समृद्धी केळकरसोबत सुत्रसंचालनाची धुरा संभाळेल. साईशा सध्या साकारत असलेल्या लक्ष्मी या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. साईशाचा सेटवरचा सहज वावर, तिचा हजरजबाबीपणा आणि तिचा निरागस अभिनय यामुळेच मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचाची सूत्रसंचालक म्हणून तिची निवड झाली.

समृद्धी आणि साईशाची छान गट्टी जमली असून सेटवर साईशा सर्वांचीच लाडकी झाली आहे. साईशाला डान्सची देखिल आवड आहे. त्यामुळे हा मंच तिच्या आवडीचा आहे. साईशाने याआधी बऱ्याच जाहिराती आणि शॉर्टफिल्म्समध्ये काम केलं आहे. स्टार प्रवाहच्याच पिंकीचा विजय असो मालिकेतील तिने साकारलेली ओवी सर्वांच्याच आवडीची आहे. त्यामुळे साईशा म्हणजेच लक्ष्मीला आता आठवड्याचे सातही दिवस भेटता येणार आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत आणि शनिवार-रविवार रात्री ९ वाजता मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचाच्या मंचावर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!