कंगणी बाबाचा स्टाईल फंडा

0

मुंबई –झी मराठी वरील देवमाणूस या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. या मालिकेतील देवमाणूस म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड पहिल्या पर्वात डॉक्टर अजितकुमार तर दुसऱ्या पर्वात कंगणी बाबा – नटवर सिंगच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आला. किरण गायकवाड हि भूमिका अगदी चोख बजावतोय. सध्या मालिकेचे कथानक हे एका रंजक वळणावर आलं आहे. किरणच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांनी मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला देखील अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं. अभिनेता किरण गायकवाड हा सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.

ऑन-स्क्रीन अजित कुमारची भूमिका साकारणारा किरण खऱ्या आयुष्यात खूपच जास्त स्टायलिश आहे. वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटोज किरण नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतंच त्याने एका अनोख्या आऊटफिटमधील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. काहींनी कंगणी बाबाच्या स्टाईल फंडाचा कौतुक केलं तर काहींनी चक्क भूलभुलैया मधील कार्तिक आर्यनची उपमा किरणला दिली आहे. कंगणी  बाबांचा हा स्टाईल फंडा व्हायरल होताना दिसतोय.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!