नाशिक-खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील जेष्ठ शिवसैनिकांसह सरपंच परिषदेचे आणि विविध पक्षांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या गटात जाहिर प्रवेश केला.यामध्ये प्रामुख्याने इगतपुरी शिवसेनेचे माजी आमदार पांडूरंग गागड, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजी भोर, माजी नगरसेवक मामा ठाकरे, कॉग्रेंसचे जिल्हा उपाध्यक्ष संपत काळे, आदींचा समावेश आहे. अनेक पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिदे गटात प्रवेश केल्याने शहर आणि जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढली आहे. अजूनही जिल्यातील विविध पक्षांचे शेकडो पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.
अलीकडे राज्यातील राजकिय घडामोडी वेगाने वाढत आहेत.मागील महिन्यात सेनेतील चाळीस आमदारांनी उठाव करत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले आहे.इतरही बारा आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत.आमदारांपाठोपाठ ,खा. गोडसे यांच्यासह राज्यातील बारा खासदारांनीही शिंदे यांच्या भूमिकेला जाहिर पांठीबा दिला आहे. काही दिवंसापूर्वी गोडसे यांनी घाटनदेवी येथून नाशिकपर्यत जोरदार रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले होते.आता खा.गोडसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयात शिंदे गटाचे संघटन सुरू झाले आहे.
शिंदे गटाच्या संघटात्मक बांधणीचा प्रारंभ मागील महिन्यात इगतपुरी तालुक्यापासून झाला होता.खासदार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यासह अनेकांनी शिंदे गटात जाहिर प्रवेश होता.आता पक्षबांधणी कार्याला वेग येणार असून आज इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार या ठिकाणी खा. गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पंचवटी विधानसभेचे माजी संपर्कप्रमुख दिलीप मोरे, शाखाप्रमुख अजित पवार, माजी उपशहर प्रमुख प्रकाश पवार, माजी शाखा प्रमुख सचिन थेटे, माजी उपविभाग प्रमुख प्रमोद घोलप, अनिल पगारे, जिल्हा परीषद कर्मचारी बँकेचे माजी अध्यक्ष विक्रम पिंगळे, देवळा शिवसेनेचे शहर प्रमुख देवा चव्हाण, शिवसेनेचे देवळा तालुका संघटक भाउसाहेब चव्हाण, देवळा उपशहर प्रमुख सतिश आहेर, देवळा शहर संघटक नाजिम तांबोळी, देवळा उपशहर प्रमुख भाऊसाहेब आहेर, शिवसेना महिला आघाडीच्या किर्ती निरगुडे, करुणा धामणे, राधिका मराठे, राष्ट्रवादीच्या कोमल साळवे, अलका नाडेकर, रेखाताई तपासे यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील सुमारे १५ सरपंचांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते प्रवेशार्थिना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख संजय बच्छाव, भाऊलाल तांबडे,लक्ष्मीबाई ताठे,सुजित जिरापुरे आदी मान्यंवर उपस्थित होते. जिल्हयात लवकरच शिवसेना शिंदे गटाचा झंझावात सुरू होणार असल्याची माहिती संपर्कप्रमुख संजय बच्छाव यांनी दिली आहे.